एक्स्प्लोर

आगळीवेगळी प्रथा! ना दुमजली घर, ना कुणाच्या घरात बाज; एवढंच काय तर गावातील पोरांचे लग्नही गावाबाहेर

औरंगाबादमधील चौंढाळा गावाचा एक इतिहास असून हजारो वर्षांच्या काही प्रथाही आहेत. त्यामुळे गावकऱ्यांकडून अखंडपणे या प्रथा पाळलल्या जात आहे.

Aurangabad Choundhala Village: प्रत्येक गावाचा वेगळा इतिहास असतो आणि वेगवेगळ्या प्रथाही असतात. त्यामुळे गावागावात लोकं अनेक वर्षांपासून अशा प्रथा पाळत असतात. अशीच काही आगळीवेगळी प्रथा औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील चौंढाळा गावाची आहे. कारण या गावात चक्क लग्न लागत नाही. त्यामुळे एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न ठरलं तर त्यांना थेट गावाबाहेर जाऊन लग्न लावावं लागतं. विशेष म्हणजे या गावात ना दुमजली घर आहे, ना कुणाच्या घरात झोपण्यासाठी खाट आहे. त्यामुळे या गावाची आगळीवेगळी प्रथा चर्चेचा विषय ठरत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड पैठण रोडवर चौंढाळा नावाचं गाव. 700 लोकवस्तीच्या या गावात रेणुका देवीचं पुरातन मंदिर आहे. ते माहूरच्या देवीचं उपपीठ म्हणून ओळखलं जातं. देवीवरील श्रद्धेपोटी किंवा भीतीमुळे शेकडो वर्षांपासून अनेक प्रथा इथे पाळल्या जातात. गावातील मुलीचं किंवा मुलाचं लग्न ठरलं, तर गावाबाहेर जाऊन लग्न लावावं लागतं. लग्न जमलेल्या मुला-मुलींची लग्नं एक तर परगावी केली जातात किंवा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवेजवळील मारोतीच्या मंदिरात लावले जातात. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार रेणुका देवी अविवाहित राहिली आणि तिचा आदर करण्यासाठी, किंवा तिचा कोप होऊ नये म्हणून या गावात आजही लग्न लावली जात नाहीत. त्यामुळे गावात ही प्रथा गेल्या हजारो वर्षांपासून पाळली जात असून आजही लग्न गावाच्या बाहरेच लावले जातात. 

दुमजली घरही नाही.... 

ज्याप्रमाणे या गावात लग्न लावली जात नाही त्याचप्रमाणे गावात कुठेच दुमजली घर सुद्धा बांधली जात नाही. कारण देवीच्या घरापेक्षा आपलं घर उंच असू नाही अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे.त्यामुळे या गावात प्रत्येक घर एकमजलीच असून त्यापेक्षा एकही घर उंच असल्याचं दिसून येत नाही. 

गावकरी जमिनीवरच झोपतात

या गावात आणखी एक प्रथा पाळली जाते आणि ती म्हणजे या गावात कुणीच खाटेवर किंवा पलंगावर झोपत नाही. त्यामुळे गावात कुणाच्याही घरात बाज, कॉट नाही. त्यासाठी पर्याय म्हणून गावातील घरांमध्ये बाजेच्या आकाराचे सिमेंटचे ओटे बनवण्यात आले असून त्यावरच गावकरी झोपतात. त्यामुळे तुम्हा आम्हाला ही प्रथा आगळीवेगळी आणि थोडीशी विचित्र वाटत असली तरीही येथील गावकरी मात्र हजारो वर्षांपासून ह्या प्रथा अखंडपणे पाळतायत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
Embed widget