एक्स्प्लोर

Uday Samant Accident : उद्योगमंत्री उदय सामंत, संभाजीराजे छत्रपती अपघातातून बचावले; स्पीड बोट जेटीच्या खांबाला आदळली

Uday Samant Accident : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे एका अपघातात सुखरुप बचावले आहेत.

Raigad Uday Samant Accident :  राज्‍याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) आज दुसऱ्यांदा बोट अपघातातून बचावले आहेत. त्यांच्या बोटीला अपघात झाला तेव्हा, त्यांच्यासोबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati)  हेदेखील बोटीत होते. आज सकाळी अलिबाग येथे येत असताना स्‍पीडबोटीच्‍या (Speed Boat) कप्‍तानाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्‍या खांबांना जावून आदळली. सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना घडली नाही. या अपघाताच्या घटनेने जेट्टीवर असलेले अधिकारी, उपस्थित नागरीक चांगलेच धास्तावले होते. उदय सामंत हे दुसऱ्यांदा अपघातात बचावले आहेत. याआधी भर समुद्रात त्यांची बोट बंद पडली होती. 

किल्‍ले रायगडावर 350 वा राज्‍याभिषेक सोहळा ( Shivrajyabhishek Sohala 2023 ) पार पडत आहे. त्‍यानिमित्ताने करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा आज पालकमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी , रायगड विकास प्राधिकरणाचे अध्‍यक्ष छत्रपती संभाजी राजे, कोकण आयुक्‍त डॉ. महेंद्र कल्‍याणकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत अलिबागच्‍या जिल्‍हाधिकारी (Alibaug Collector Office) कार्यालयात घेण्‍यात आला. या बैठकीसाठी उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे आज सकाळी स्‍पीडबोटीने अलिबागला यायला निघाले होते. त्यावेळी हा अपघात (Speed boat Accident) झाला. 

असा झाला अपघात

समुद्रात बोटीचा वेग कमी होता. मात्र मांडवा जेटीजवळ बोट आली असता कप्‍तानाने बोटीचा वेग वाढवला. मात्र, त्‍याचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट वेगाने जेटीकडे निघाली. सुदैवाने ही बोट जेटीच्‍या खालील भागात शिरली आणि खांबांना आदळली आणि उदय सामंत आणि संभाजीराजे अगदी थोडक्‍यात बचावले. गियरमध्‍ये बिघाड झाल्‍याने हा प्रकार झाल्‍याचे म्हटले जाते. अपघाताची घटना आमदार महेंद्र दळवी आणि त्‍यांचे सहकारी शिवसेनेचे कार्यकर्ते जेटीवरून पाहत होते. आम्‍हीदेखील या प्रकाराने घाबरलो होतो असे आमदार दळवी म्‍हणाले. 

यापूर्वीदेखील झालाय अपघात

यापूर्वीदेखील एकदा अलिबागहून मुंबईकडे परतत असताना उदय सामंत यांना घेवून जाणारी बोट गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रातच बंद पडली होती. बराचवेळ ती समुद्रात तरंगत होती. त्‍यानंतर दुसऱ्या बोटीने सामंत किनाऱ्यावर पोहोचले होते. रायगडमधील तीन आमदारांपैकी कुणाला तरी पालकमंत्री व्‍हायचंय म्‍हणूनच हे प्रकार होत असावेत असे सामंत गमतीने म्‍हणाले आणि एकच खसखस पिकली.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget