एक्स्प्लोर

खातेवाटपाच्या यादीत प्रोटोकॉल क्रमांक वरखाली कसे झाले?

ज्या यादीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते ती खातेवाटपाची यादी अखेर अधिकृतपणे जाहीर झाली. कुणाला कुठलं खातं मिळालं याची चर्चा तर झालीच पण या यादीत काही क्रमांक ज्या पद्धतीनं वर खाली झालेत त्यावरूनही कुजबूज सुरु झाली आहे.

मुंबई : सरकारी काम म्हटलं की तिथं प्रत्येक गोष्टीत शिष्टाचार, प्रोटोकॉल पाळला जातो. पण आज झालेल्या खातेवाटपाच्या यादीत मात्र अनेक नावं ज्येष्ठतेचा क्रम चुकवत वर खाली झाली आहेत. खात्याचं महत्व आणि क्रम याचा थेट संबंध नसला तरी अगदी सापशिडीप्रमाणे काही लोकांना वरखाली जावं लागल्यानं याची चर्चाही सुरु झाली. ज्या यादीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते ती खातेवाटपाची यादी अखेर अधिकृतपणे जाहीर झाली. कुणाला कुठलं खातं मिळालं याची चर्चा तर झालीच पण या यादीत काही क्रमांक ज्या पद्धतीनं वर खाली झालेत त्यावरूनही कुजबूज सुरु झाली आहे. या यादीतल्या क्रमांकावरुन खात्याचे महत्व ठरत नाही. आमदारांची ज्येष्ठता, आधीच्या मंत्रि‍पदाचा कार्यकाळ या गोष्टी लक्षात घेऊन हा क्रम ठरत असावा. पण आज जाहीर झालेल्या काही नावांबाबत मात्र या निकषांचं उल्लंघन झालंय का असे प्रश्न उपस्थित होतायत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं नाव 10 व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या आधी 8 व्या क्रमांकावर नवाब मलिक यांचं नाव आहे. थोरात हे सध्या काँग्रेसचे गटनेते, 8 वेळा आमदार आणि 1999 लाच त्यांची मंत्रिमंडळावर पहिल्यांदा वर्णी लागली होती. काँग्रेसनं उपमुख्यमंत्रीपद घेतलं नसलं तरी एका अर्थानं थोरात हे काँग्रेसचे मंत्रिमंडळात नेतृत्व करतायत. पण त्यांचा उल्लेख थेट 10 व्या क्रमांकावर आहे. शिवाय त्यांच्याकडे असलेले महसूल खातं हे देखील राज्यात टॉप 4 खात्यांपैकी मानलं जातं. काँग्रेसमध्ये या खात्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणही हटून बसले होते. पण शेवटी हायकमांडचा वरदहस्त थोरात यांच्याच पाठीमागे राहिला. अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री असल्यानं त्यांचं नाव यादीत वरच्या स्थानावर असणं अपेक्षितच होतं. पण पहिल्या दहा जणांच्या यादीत सुभाष देसाई सोडले तर सगळे राष्ट्रवादीचे नेते आहेत.  मंत्रिमंडळ खातेवाटपाला राज्यपालांची मंजुरी, अधिकृत खातेवाटप जाहीर यादीत असाच क्रमांक चुकल्याचा प्रश्न उपस्थित होतो मुंडे यांच्याही बाबतीत. धनंजय मुंडे हे यावेळी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकले. पण त्याआधी ते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते होते. पण तरीही यादीत त्यांचं नाव 32 व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या नंतर उरतात ते फक्त आदित्य ठाकरे. जे पहिल्यांदाच आमदार झालेत. विधानसभेच्या निकालावेळी धनंजय यांच्या परळीतल्या विजयाची खूप चर्चा झाली. पंकजा मुंडे यांना त्यांनी तब्बल 30 हजार मतांनी पराभूत केलं. त्यानंतर राष्ट्रवादीचं सरकार बनणार असं दिसताच त्यांचं नाव उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही घेतलं जात होतं. पण त्यांना सामाजिक न्याय हे खातं मिळालं. मिळालेलं कुठलंच खातं हे कमी महत्वाचं नसतं याचा वस्तुपाठ राष्ट्रवादीतच आर आर पाटील यांनी दाखवून दिला आहे. आता या खात्याचा सचोटीनं वापर करुन धनंजय मुंडे पुन्हा आपलं काही नवं स्थान निर्माण करणार का याचीही उत्सुकता असेल. एकनाथ शिंदे हे मागच्या सरकारमध्ये शिवसेनेचे महत्वाचे नेते. सेनेकडून त्यांचं नाव अगदी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतं. पण त्यांचंही नाव 17 व्या क्रमांकावर आहे. शिंदे यांना नगरविकास आणि सोबतच त्यांना हवं असलेलं सार्वजनिक बांधकाम खातंही ठेवण्यात आलंय. पण यादीत जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड यांच्यानंतर त्यांची वर्णी लागली आहे. यादीत क्रमांक कुठलाही असला तरी अर्थात मंत्र्यांचं खरं रेटिंग ठरणार आहे ते जनतेसाठी किती तप्तरतेनं काम करतात यावरुनच. पण सरकारी प्रक्रियेत जिथं प्रोटोकॉलला जिथं उठता बसता महत्व असतं. तिथं मंत्रिमंडळाच्या यादीत मात्र असे उलटसुलट क्रम का लावलेत. की या छोट्या गोष्टींमधून काही लोकांपर्यंत योग्य तो मेसेज पोहचवण्याचा हा प्रयत्न याचीही चर्चा सुरु झालीय.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
ITC : केंद्राच्या निर्णयाचा सलग दुसऱ्या दिवशी ITC ला फटका, दोन दिवसात 72300 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी पाण्यात
ITC चा स्टॉक सलग दुसऱ्या दिवशी कोसळला, दोन दिवसात 73200 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी बुडाले
Embed widget