एक्स्प्लोर

मंत्रिमंडळ खातेवाटपाला राज्यपालांची मंजुरी, अधिकृत खातेवाटप जाहीर

मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्वांना खातेवाटपाची प्रतीक्षा होती, ती आता संपली आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची संभाव्य खातेवाटपाची यादी 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यामुळे अधिकृत खातेवाटप जाहीर झालं आहे. खातेवाटपाची यादी काल रात्री 7.30 वाजता राज्यपालांकडे सुपूर्द केल्याचं जयंत पाटलांनी ट्विटवरुन स्पष्ट केलं होतं. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्वांना खातेवाटपाची प्रतीक्षा होती, ती आता संपली आहे. राज्यपालांची सही होऊन मंजूर झालेली मंत्रिमंडळ यादी माझाच्या हाती आली आहे.

खातेवाटपात यादीनुसार बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल तर अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलं आहे. तर नितीन राऊत यांच्याकडे उर्जा खातं देण्यात आलं आहे. पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना नगरविकास, सार्वजनिक बांधकाम तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण खात्याची जबाबदारी दिली आहे. तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख गृहमंत्री, छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील यांना राज्य उत्पादन शुल्क खातं मिळालं आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खातेवाटप यादी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना यांना पाठवली असल्याचं म्हटलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे आज सायंकाळी 7.30 वाजताच मंत्रिमंडळाची खातेवाटप यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आंनी राज्यपाल यांच्याकडे पाठवली आहे. राज्यपाल लवकरच त्या यादीवर शिक्कामोर्तब करतील, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं.

खातेवाटपाची अधिकृत यादी

उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेली खाती अजित पवार - उपमुख्यमंत्री, वित्त, नियोजन कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई - उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून) छगन भुजबळ - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण दिलीप वळसे- पाटील - कामगार, राज्य उत्पादन शुल्क जयंत पाटील - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास नवाब मलिक - अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता अनिल देशमुख - गृह बाळासाहेब थोरात - महसूल राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन राजेश टोपे - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण हसन मुश्रीफ - ग्राम विकास डॉ.नितीन राऊत - उर्जा वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण डॉ.जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण एकनाथ शिंदे - नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) सुनिल केदार - पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण विजय वडेट्टीवार - इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य उदय सामंत - उच्च व तंत्र शिक्षण दादाजी भुसे - कृषि, माजी सैनिक कल्याण संजय राठोड - वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता ॲड. के.सी. पाडवी - आदिवासी विकास संदिपानराव भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादन बाळासाहेब पाटील - सहकार, पणन अनिल परब - परिवहन, संसदीय कार्य अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास यशोमती ठाकूर - महिला व बालविकास शंकराराव गडाख - मृद व जलसंधारण धनंजन मुंडे - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आदित्य ठाकरे - पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार राज्यमंत्री अब्दुल सत्तार - महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य सतेज पाटील - गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण शंभुराज देसाई - गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन बच्चू कडू - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार दत्तात्रय भरणे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन डॉ. विश्वजीत कदम - सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राजेंद्र पाटील यड्रावकर - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य संजय बनसोडे - पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य प्राजक्त तनपुरे - नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन आदिती तटकरे - उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahmednagar News: मोठी बातमी: नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती, जनावरांना दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक, शेतकरी टेन्शनमध्ये
मोठी बातमी: नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती, जनावरांना दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक, शेतकरी टेन्शनमध्ये
Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील लूक समोर; हात मोडला पण जलवा दाखवलाच
ऐश्वर्या रायचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील लूक समोर; हात मोडला पण जलवा दाखवलाच
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
Karale Master Full Speech Manmad : 4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा
4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ बंद पाडा, कराळे मास्तरांनी खळखळून हसवलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Thane : 4 जूननंतर मोदी नसतील लिहून ठेवा,ठाण्यातील भाषणात ठाकरे बरसलेTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 17 May 2024 : ABP MajhaNarayan Rane Full Speech Mumbai : उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचा मुख्यमंत्री, येताना कोरोना घेऊन आलेABP Majha Headlines : 07 AM : 17 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahmednagar News: मोठी बातमी: नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती, जनावरांना दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक, शेतकरी टेन्शनमध्ये
मोठी बातमी: नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती, जनावरांना दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक, शेतकरी टेन्शनमध्ये
Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील लूक समोर; हात मोडला पण जलवा दाखवलाच
ऐश्वर्या रायचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील लूक समोर; हात मोडला पण जलवा दाखवलाच
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
Karale Master Full Speech Manmad : 4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा
4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ बंद पाडा, कराळे मास्तरांनी खळखळून हसवलं
बोरीवली कोकण रेल्वेला जोडण्याच्या कामाला मंजुरी, हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत येणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
बोरीवली कोकण रेल्वेला जोडण्याच्या कामाला मंजुरी, हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत येणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
Horoscope Today 17 May 2024 : आजचा दिवस 'या' राशींसाठी खास; अचानक धनलाभ होणार, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा दिवस 'या' राशींसाठी खास; अचानक धनलाभ होणार, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
Embed widget