एक्स्प्लोर

शेतकऱ्यांसाठी एक रुपयात जेवण...!

बीड : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अशा काळात एकेवेळचं बाहेर जेवायचं असल्यास किमान 100 रुपये तरी मोजावे लागता. मात्र, हेच जेवण तुम्हाला 1 रुपयात दिले तर...? खरंतर सहसा विश्वास यावर तुमचा बसणार नाही. मात्र, बीडमध्ये एका रुपयात जेवण दिले जाते. मात्र, हे भरपेट स्वस्त जेवण फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे. भाजी, चपाती, भात, वरण यांसोबत पापड आणि पिण्यासाठी फिल्टरचं पाणी... हे सगळं केवळ एक रुपयात मिळत आहे. शेतीमालाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना दिवसभर बाजार समितीच्या आवारात थांबावं लागतं. यावेळी शेतकऱ्यांच्या जेवणाचं हाल होतात. यावर उपाय म्हणून माजलगाव बाजार समितीने एक रुपयात जेवण हा उपक्रम राबवला. माजलगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर ही बाजार समिती आहे. त्यामुळे सकाळी आपला माल घेऊन आलेल्या शेतकऱ्याला आपल्या शेतीमालाची विक्री करण्यासाठी दुपार होतेच. त्यातच जवळ जेवणासाठी कोणतेही हॉटेल नाही म्हणून शेतकऱ्यासाठी एक रुपयात जेवल मिळू लागल्याने स्वस्तात एक वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला. हे जेवण करण्यासाठी मात्र शेतकऱ्याला मालाची पोचपावती दाखवणं बंधनकारक आहे. गेल्या सहा वर्षांपासून माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्य शेतकऱ्यांसाठी एक रुपयात जेवण दिल जातं आहे. बाजार समितीने एका हॉटेल चालकाला एकोणतीस रुपयाप्रमाणे प्रती शेतकऱ्याचं जेवण ठरवून दिले आहे. यात शेतकऱ्याने फक्त एक रुपया द्यायचा, बाकी राहिलेले पैसे बाजार समिती भरते. रोज दीडशे ते दोनशे शेतकरी या ठिकाणी जेवण करत आहेत. या वर्षी सरकारने तूर खरेदी केंद्र सुरु केले खरे, पण 15-15 दिवस तुरीचे मापच न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना बाजार समितीची आवारातच मुक्कामी राहावे लागले. अशा परस्थितीमध्ये हमीभावाबरोबरच प्रत्येक बाजार समितीने आपल्या शेतकऱ्यासाठी एक रुपयात जेवण हा उपक्रम सुरु केला, तर निश्चितपणे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. एरव्ही केवळ बाजारभाव पडल्याने अनेक बाजार समिती ओस पडलेल्या असतात. मात्र, माजलगाव बाजार समिती मात्र याला अपवाद आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदींनी तीन वेळा पंतप्रधानपद भूषवून नेहरूंचा रेकॉर्ड मोडल्याचा राहुल गांधींना राग; रामदास आठवलेंचा विरोधकांवर निशाणा, अभिजीत दिपकेंना खास ऑफर
नरेंद्र मोदींनी तीन वेळा पंतप्रधानपद भूषवून नेहरूंचा रेकॉर्ड मोडल्याचा राहुल गांधींना राग; रामदास आठवलेंचा विरोधकांवर निशाणा, अभिजीत दिपकेंना खास ऑफर
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Embed widget