एक्स्प्लोर

मोठी बातमी : लातूरमध्ये शरद पवारांचा भाजपला 'दे धक्का'; माजी आमदार तुतारी हाती घेणार

Latur News : उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शरद पवार लातूरमध्ये भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. लातूरचे माजी आमदार भाजपची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे भाजपला (BJP) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भाजपाचे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) हे 11 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. 

राज्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) जोरदार दणका दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला धक्के देण्याची मोहीम हाती घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शिवसंकल्प दौऱ्यात माजी उपमहापौर आणि काही नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देत उद्धव ठाकरे यांनी भाजपला धक्का दिला. आता शरद पवारांकडून भाजपला मराठवाड्यात दुसरा दणका बसणार असल्याचे समजते. 

क्रीडामंत्री बनसोडेंविरोधात भालेराव निवडणुकीच्या रिंगणात?

माजी भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा येत्या 11 जुलै रोजी आपल्या मोजक्या समर्थकांसह मुंबईत शरद पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे. राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात सुधाकर भालेराव हे शरदचंद्र पवार पक्षातून अर्थात महाविकास आघाडीतून उदगीर विधानसभा मतदारसंघात मैदानात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.  

लातूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढणार

यापूर्वी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर या मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार विनायकराव पाटील यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षामध्ये झालेला आहे. लातूर जिल्ह्यात भाजपाचे दोन माजी आमदार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यात शरद पवार गटाची ताकद वाढताना दिसत आहे.

उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का

शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. या शिवसंकल्प मेळाव्यादरम्यान भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदेंसोबत भाजपचे नगरसेवक गोकुळ मलके, प्रल्हाद निमगावकर, अक्रम पटेल, प्रकाश गायकवाड, रुपचंद वाघमारे यांनीही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

आणखी वाचा

Sharad Pawar : सैन्यदलातील प्रमुखांचे एकमत नसताना संरक्षण मंत्री म्हणून मी निर्णय घेतला अन् सैन्यात मुलींना स्थान दिले: शरद पवार  

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
Embed widget