Sanjay Bansode : अनपेक्षितपणे संजय बनसोडेंना दुसऱ्यांदा मंत्रीपद मिळाले; कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
Maharashtra Political Crisis: पुन्हा संजय बनसोडे आमदारकीच्या एकाच टर्मममध्ये दुसऱ्यांदा तेही कॅबिनेट मंत्री झाले आहेत.
Maharashtra Political Crisis: राज्याच्या विरोधी पक्षनेते पदावर असलेले अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन महाराष्ट्रात राजकीय भूकंप आणला. दरम्यान हा धक्का कमी होता की काय लातूरकरांना या शपथविधीनंतर आणखी एक सुखद धक्का बसला. कारण अजित पवारांसोबत गेलेल्या संजय बनसोडेंना (Sanjay Bansode) अनपेक्षितपणे दुसऱ्यांदा मंत्रीपद मिळाले आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील अचानकपणे त्यांची राज्यमंत्री पदावर वर्णी लागली होती. त्यात आज पुन्हा संजय बनसोडे आमदारकीच्या एकाच टर्मममध्ये दुसऱ्यांदा तेही कॅबिनेट मंत्री झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच रविवारी अचानकपणे त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आणखी 8 आमदारांनी देखील यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात लातूरला कॅबिनेट मंत्रिपदाचा सुखद धक्का बसला असून, पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले आमदार संजय बनसोडे आमदारकीच्या एकाच टर्मममध्ये दुसऱ्यांदा तेही कॅबिनेट मंत्री झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही वेळा बनसोडे अचानकपणे मंत्री झाले आहेत.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कार्यकर्ते असलेले आमदार बनसोडे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक राहिले आहेत. कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सचिव अशी त्यांची पक्षसंघटनेतील वाटचाल राहिली आहे. 2014 मध्ये उदगीर राखीव मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी उदगीरमध्ये जनसंपर्क वाढवला. परंतु, पहिल्या प्रयत्नात त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये मात्र बनसोडे निवडून आले. ज्या मतदारसंघात भाजपाची पकड मजबूत होती, तिथे केवळ व्यक्तिगत संपर्क आणि पक्षाच्या पाठबळावर बनसोडे निवडून आले होते. आमदार म्हणून निवडून येणे हेच मोठे यश मानलेल्या बनसोडे यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनपेक्षितपणे राज्यमंत्रिपद मिळाले. विशेष म्हणजे रविवारी झालेल्या राजकीय घडामोडीनंतर पुन्हा एकदा त्यांची अचानकपणे कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लागली.
लातूर जिल्ह्यातील परिस्थिती...
लातूर जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ असून, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2 आणि भाजपाचे 2 आमदार आहेत. तसेच जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले राष्ट्रवादीचे एक शिक्षक आमदार आणि भाजपाचे विधान परिषदेतील एक आमदार असे संख्याबळ आहे. विशेष म्हणजे भाजपकडून फडणवीसांचे जवळ असलेले अभिमन्यू पवार यांच्या नावाची मंत्रीपदासाठी चर्चा होती. मात्र अजित पवारांच्या एन्ट्रीनंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या धक्कातंत्राने चित्रच बदलले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Maharashtra NCP Crisis: अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील पक्षीय बलाबलही बदललं; कोणाचे किती आमदार?