स्वत: च्या मतदारसंघात मुताऱ्या बांधता आल्या नाही, त्या देशमुखांनी आतापर्यंत किती निधी आणलाय? निलंगेकरांचा अमित देशमुखांवर निशाणा
स्वत: च्या मतदारसंघात मुताऱ्या बांधता आल्या नाही, त्या देशमुखांनी आतापर्यंत मतदारसंघासाठी किती निधी आणलाय? संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्यावर निशाणा साधलाय.
Maharashtra Latur Politcal News: ज्यांना स्वत: च्या मतदारसंघात मुताऱ्या बांधता आल्या नाहीत, त्या अमित देशमुखांनी (Amit Deshmukh) आतापर्यंत किती निधी आणला, असं म्हणत संभाजी पाटील निलंगेकरांनी (Sambhaji Patil Nilangekar) माजी पालकमंत्री आणि आमदार अमित देशमुखांवर निशाणा साधला आहे. तसेच पुढे बोलताना निलंगेकरांनी देशमुखांना जाहीर आव्हानही दिलं आहे. जाहीर आव्हान आहे 2014 ते 2019 या आमच्या काळातील निधीची तुलना आतापर्यंतच्या त्यांच्या इतिहासाशी जुळवून पाहा, असं थेट आव्हान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी माजी पालकमंत्री आणि आमदार अमित देशमुख यांना दिलं आहे. ते काल (रविवारी) निलंगा (Nilanga News) येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी थेट अमित देशमुखांना फैलावर घेतलं आहे.
संभाजी पाटील निलंगेकरांनी बोलताना म्हटलं की, "2014 ते 2019 या काळात भाजपाची सत्ता होती. त्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात भरघोस विकास निधी आला. अनेक कामं झाली, मात्र सत्ता बदल झाल्यावर अडीच वर्षात विकास निधी अत्यल्प आला. त्यातही निलंगा तालुक्यावर कायमच देशमुखांनी अन्याय केला आहे. देशमुख यांनी कायम निलंगाचा आणि निलंगेकरांचा दुस्वास केला आहे. मागील इतिहास जर काढला तर लातूरमध्ये अमित देशमुखांनी अनेक वर्ष सत्ता उपभोगली, त्या काळात आलेला निधी आणि मी पालकमंत्री असताना आलेला निधी किती? हे एकदा तपासा. देशमुखांना लातूर येथे साध्या मुताऱ्या बांधता आल्या नाहीत. आमच्या सत्तेच्या काळात आम्ही त्या बांधल्या आहेत."
पाहा व्हिडीओे : Sambhaji Nilangekar on Amit Deshmukh : मुताऱ्या बांधता न आलेल्या देशमुखांनी,मतदारसंघात किती निधी आणला?
संभाजी पाटील निलंगेकर पुढे बोलताना म्हणाले की, "मागचा माझा इतिहास काढून पाहा. जेवढा निधी मी लातूरला दिलाय ना, मी कोणाच्या खोलात नाही जात. मागचा सगळा इतिहास काढा आणि 2014 मधला भाजपच्या काळातील सरकारचा इतिहास काढा. माझं जाहीर आव्हान आहे तिथल्या आमदाराला. त्यांनी माझ्यासोबत बसावं आणि 2014 आणि 2019 सालचा इतिहास काढावा आणि सांगावं निधी कधी, कोणत्या साली जास्त आलाय. त्यांच्या संपूर्ण काँग्रेसच्या कालावधीत जेवढा निधी आला नाही, तेव्हा आम्ही आमच्या सरकारच्या काळात आणलाय." पुढे बोलताना ते म्हणाले की, "साध्या मुताऱ्या बांधणं त्यांना जमलं नाही, आमच्या सरकारच्या काळात आम्ही बांधून दिल्यात त्या मुताऱ्या."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Latur News: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या