लातूर जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ; पिके करपली, 171 प्रकल्पात फक्त 25 टक्के पाणीसाठा शिल्लक
2016 चा ऐतिहासिक दुष्काळ अनुभवलेल्या लातूर जिल्ह्यात 2022 पर्यंत सातत्याने पावसाने उत्तम साथ दिली होती. मात्र यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच पाठ फिरविल्यामुळे पाणी प्रश्न गंभीर बनला आहे
लातूर: लातूर (Latur News) जिल्ह्यात पावसाने मागील महिनाभरापासून पाठ फिरवली आहे.याचा थेट परिणाम खरीप पिकावर झाला आहे.फुलोऱ्यात असलेले सोयाबीन पिके करपू लागली आहेत.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची पिके वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास खरिपाची पिके हातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर्षी पावसाळ्याला उशिरा सुरुवात झाली. पेरणी उशिरा झाल्या आहेत. त्यातच पावसाळ्याची नक्षत्र कोरडी गेली आहेत.पावसाचा अभाव कोरडी हवा वाढलेली उष्णता याचा परिणाम कोवळ्या सोयाबीन पिकावर होत आहे. जे सोयाबीन फुलोऱ्यात आहे या वातावरणामुळे फुल गळतीच प्रमाण वाढले आहे. पाण्याअभावी सोयाबीनला फळधारणा होण्याची शक्यता अत्यल्प झाली आहे. शेतात सोयाबीन दिसतय मात्र उत्पादन येणार नसल्याची भीती आता शेतकरी व्यक्त करताेय. ज्या शेतकऱ्यांचे टोमॅटो हे काढणीला आली होती. ते टोमॅटो वाढलेली उष्णता आणि पाण्याअभावी करपून गेली आहेत. त्यातच टोमॅटोचा बाजार भाव पडला असल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
पाच लाख हेक्टर वरील सोयाबीन धोक्यात
लातूर जिल्ह्यात सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. लातूर जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र हे सहा लाख हेक्टर पेक्षा जास्त आहे. यात पाच लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होत असते. उर्वरित क्षेत्रावर तूर मूग उडीद आणि इतर पिके घेतली जातात. यावर्षी जून महिन्यात पावसाने हजेरी न लावल्याने जुलै महिन्याच्या पेरणी लायक पावसावरच विलंबाने पेरण्या झाल्या होत्या. आता पावसाने तब्बल महिन्याभराची उघडी दिल्याने ही पिके आजचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. फुलोरातील फुल गळतीचे प्रमाण वाढला आहे. याचा थेट परिणाम उत्पादन मोठ्या प्रमाणात घटनेवर होणार आहे.
अडीच महिने संपले पावसाची प्रतिक्षा
पावसाने यावर्षी सुरुवातीपासूनच जिल्ह्याला साथ दिली नाही. 2016 चा ऐतिहासिक दुष्काळ अनुभवलेल्या लातूर जिल्ह्यात 2022 पर्यंत सातत्याने पावसाने उत्तम साथ दिली होती. मात्र यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच पाठ फिरविल्यामुळे पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 323 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 205 मिलिमीटर पावसाची तूट आहे. पावसाळ्याची दोन अडीच महिन्यात सुरुवातीच्या काळात पावसाने कांतीला त्यानंतरच्या पावसावर पेरणी झाली. आता महिनाभर होत आलं तरीही पावसाचा पत्ताच नसल्याने उगवलेल्या पिकाचे काय असा प्रश्न निर्माण झालाय. शेतीचा पाण्याचा प्रश्न बरोबरच पिण्याचा पाण्याचा प्रश्नही आता हळूहळू गंभीर होतोय.
पिके करपली प्रकल्प कोरडे
पावसाळ्याची दोन महिने होत आली आहेत. मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षाच पेरणी एवढा पाऊस झालाय मात्र नंतर पावसाने पाठ फिरवली ती अद्याप याचा परिणाम जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांवर झाला आहे.
लातूर जिल्ह्यात जलसंपदा विभागाच्या एकूण 171 प्रकल्पात 25% जलसाठा शिल्लक राहिला आहे.यात दोन मोठे प्रकल्प, 8 मध्यम प्रकल्प , 134 लघु प्रकल्प तसेच 27 बंधारे यांचा समावेश आहे.या सर्व प्रकल्पात आज रोजी 191 दलघमी (25%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.मागील वर्षी आज रोजी 529.88 दलघमी (69%) उपयुक्त पाणीसाठा होता. जिल्ह्यातल्या व्हटी आणि तिरु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शून्यावर आला आहे . तर इतर सहा प्रकल्पांमध्ये केवळ 25 टक्के पाणीसाठा उरला आहे. लातूर जिल्ह्यातल्या आठ मध्यम प्रकल्पांमध्ये असलेला पाणीसाठ्याचे प्रमाण असे आहे.
- तावरजा- 2 टक्के
- रेणापूर-24 टक्के
- व्हटी-00
- तिरु-00
- देवर्जन-39 टक्के
- घरणी-28टक्के
- मसलगा-30 टक्के
- साकोळ-54 टक्के
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची अवस्था ही गंभीर बनली आहे.जिल्ह्यात मागील पंचवीस दिवस होत आले आहेत पावसाने पाठ फिरवली आहे. या पंचवीस दिवसात कधीतरी पावसाच्या अतिशय हलक्या सरी बरसून गेल्या आहेत . ज्याचा उपयोग ना शेती साठी ना पाण्यासाठी झाला आहे. येत्या काळात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्ह आहेत.
हे ही वाचा :