![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Latur Freestyle : 'त्या' दोघी भिडल्या; दंडाच्या रक्कमेवरून टोईंग कर्मचारी आणि वाहन चालकात लातूरमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
लातूरच्या मुख्य बाजारपेठेत पन्नास रुपयाच्या दंडाच्या पावतीवरून वाद पेटला. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
![Latur Freestyle : 'त्या' दोघी भिडल्या; दंडाच्या रक्कमेवरून टोईंग कर्मचारी आणि वाहन चालकात लातूरमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, व्हिडीओ व्हायरल Freestyle between towing staff and vehicle driver in Latur over fine amount video goes viral Latur Freestyle : 'त्या' दोघी भिडल्या; दंडाच्या रक्कमेवरून टोईंग कर्मचारी आणि वाहन चालकात लातूरमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, व्हिडीओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/d1ab76d3e69214bdeb584d9ad68f252b168439682796189_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर : क्षुल्लक कारण हाणामारी झाल्याचं आपण आजवर अनेकदा पाहिलं असेल. अशाच एका क्षुल्लक कारणामुळे लातूरमध्ये महिला टोईंग कर्मचारी आणि महिला वाहन चालकात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. लातूरच्या मुख्य बाजारपेठेत पन्नास रुपयाच्या दंडाच्या पावतीवरून वाद पेटला आणि थेट हाणामारीवर येऊन थांबला. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
लातूरच्या मुख्य बाजारपेठत काल महिलांच्या फ्री स्टाईल हाणामारीच्या घटनेने गाजले आहे. लातूर शहरात बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून खासगी संस्थेला परवाना देण्यात आला आहे. यामध्ये वाहन जर चुकीच्या ठिकाणी पार्क केले असेल तर आर्थिक दंड आकारला जातो. यावरून या कर्मचारी आणि वाहन चालकाचे कायमच भांडणं होतात. यामुळे या खासगी संस्थेने दहा महिला कर्मचारी नियुक्त केल्या आहेत. त्यांच्याबरोबर आता लोक त्यांच्याशी देखील वाद घालत आहेत. काल तर हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहचला. दरम्यान हे भांडणं पाहणाऱ्या नागरिकांना मात्र हाणामारीचे कारण काही समजत नव्हते. या हाणामारीच्या घटनेची चर्चा मात्र बराच काळ परिसरात रंगली होती.
लातूर शहरातील मुख्य बाजारपेठत महिला टोईंग कर्मचाऱ्यांनी एका महिला वाहन चालकास चुकीच्या पार्किंगबाबत पन्नास रुपयाचा दंड आकारला. 50 रुपयांचा दंड आकारला त्यामुळे वाद पेटला. वाद पाहता पाहता हाणामारीवर आला. यावेळी ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली. लातूर मनपाने दिलेल्या कंत्राटानुसार हे काम चालत आहे. यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असणे आवश्यक आहे. पिवळ्या पट्टीच्या आत वाहन आढळून आले नाही तर वाहन धारकास आर्थिक दंड आकारला जातो. मात्र मनपा या पिवळ्या पट्ट्या रंगवून देत नाही. त्यामुळे वाहन धारकास सीमारेषा लक्षात येत नाही. यातून मग टोईंग कर्मचारी आणि वाहन चालक यांचा वाद ठरलेला अशी स्थिती आहे.
पुरुष टोईंग कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यात वाद होतात. ही बाब लक्षात घेऊन खासगी कंत्राटदार यांनी दहा महिला कर्मचारी नियुक्त केल्या आहेत. मात्र स्थितीत सुधारणा झाली नाही. वाद नित्याचे झाले आहेत. अतिशय खालच्या पातळीची भाषा वापरत वाद होत असतात. काल तर अक्षरशः वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. प्रकरण पोलिसात गेले नाही मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आहे.
हे ही वाचा :
Nashik Free style : दहावीचा पेपर सुटला अन् विद्यार्थिनी एकमेकींना भिडल्या, फ्री-स्टाईल हाणामारी व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)