Latur News: गावी जाण्यावरुन घरच्यांशी वाद, रागाच्या तिरमिरीत क्लासला गेला अन् इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवलं
Crime News: लातूराच्या खाजगी शिकवणी क्लासेस परिसरात एका 14 वर्षीय शाळकरी मुलांची इमारतीवरून उडी घेत आयुष्याची अखेर केली. कौटुंबिक कलहामुळे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती.
लातूर: लातूर शहरातल्या खाजगी क्लासेस परिसरात एका 14 वर्षीय शाळकरी मुलाने क्लासेसच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत या मुलाने आत्महत्या (Boy Suicide in Latur) केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान जखमी मुलाला उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णाला दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले आहे. दरम्यान या घटनेबाबत लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर अधिकचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत.
लवकर ओळखच पटली नाही
अल्पवयीन मुलगा शैलेश अनिल शिंदे हा यावर्षी दहावीत गेला आहे.हा मुलगा चाकूर तालुक्यातील गांजूर येथील रहिवासी आहे.शिंदे कुटुंबाने आपल्या मुलाला शिक्षणासाठी लातूर भाड्याने घर घेऊन ठेवले होते. यादरम्यान दहावीसाठी फाउंडेशन कोर्ससाठी नालंदा कॅम्पस या खाजगी शिकवणी मध्ये त्याने प्रवेश घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार त्याला गावाकडे जायचं होतं. मात्र, घरच्यांनी त्याला जाऊ दिलं नाही. यामुळे रागाच्या भरात असलेला शैलेश घरातून बाहेर पडल्यानंतर थेट क्लासच्या चौथ्या मजल्यावर गेला आणि उडी मारत आत्महत्या केली.
काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उद्योग भवन परिसरातील नालंदा कॅम्पस या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून या मुलाने उडी घेत आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर आणि पोलीस निरीक्षक विशाल शहाणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली पंचनामा केल्यानंतर त्याला लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी शैलेशला तपासून मृत घोषित केले. तो विद्यार्थी नेमका कोण याची माहिती बराच काळ कळालीच नाही. त्याची ओळख पटत नसल्याने बराच गोंधळ निर्माण झाला होता. त्यातच शिंदे कुटुंबीय त्याची शोधाशोध करत होते. दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डॉक्टरांच्या माहितीवरून सोमवारी रात्री अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एकुलता एक मुलगा शिक्षणासाठी लातूरमध्ये
मयत मुलाचे वडील हे शेतकरी असून त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. आपला मुलगा डॉक्टर व्हावा यासाठी त्यांनी लातूरला भाड्याने घर घेऊन वास्तव्य केले होते. दरम्यान त्याला फाउंडेशन कोर्ससाठी नालंदा कॅम्पस येथे शिकवणीही लावली होती. तो नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी घरातून बाहेर पडला आणि स्वतःचे जीवन संपवत आणि अनेक प्रश्न मागे ठेवले.
आणखी वाचा
सचिन तेंडुलकरच्या घरी काम करणाऱ्या एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या