Stamp Duty Penalty : दंड आणि शास्तीवर 90 टक्के सवलत मिळविण्यासाठी शेवटचे सहा दिवस, 31 जुलैला संपतोय मुद्रांक शुल्काच्या दंडाबाबत सवलत योजनेचा पहिला टप्पा
योजनेचे स्वरुप महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलमांन्वये मुद्रांक शुल्क शास्तीच्या संदर्भात 31 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी नोटीस प्राप्त झालेल्यांसाठी ही सवलत योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

नागपूर : एप्रिलपासून सुरु झालेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा 31 जुलै रोजी समाप्त होत आहे. ज्यांना थकीत मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकीत शास्ती या संबंधी 31 मार्चपूर्वी नोटीस मिळाली आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांनी तत्काळ जिल्ह्याचे जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे काया्रलयाशी संपर्क साधावा. यात पहिल्या टप्प्यात संबंधितांना थकीत शास्तीवरील 90 टक्के सवलत देण्यात येत आहे.
यांच्यासाठी योजना
संबंधितांनी 31 जुलैपर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास सवलतीच्या पहिल्या टप्प्याचा म्हणजेच थकीत शास्तीवरील 90 टक्के सवलतीचा लाभ मिळेल. नंतर दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकीत शास्तीवर 50 टक्के दंड भरावा लागेल. योजनेचे स्वरुप महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलमांन्वये मुद्रांक शुल्क शास्तीच्या संदर्भात 31 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या पक्षकारांसाठी ही माफी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 50 टक्के सुट
ही योजना 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. माफी योजना ही शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली आहे. 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापूर्वीच भरले असल्यास दंडाची रक्कम भरल्यास, दंडाच्या रकमेत 90 टक्के सुट मिळेल. 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापूर्वीच भरले असल्यास दंडाची रक्कम भरल्यास दंडाच्या रकमेत 50 टक्के सुट मिळेल.
योजनेची अधिक माहिती
योजनेबाबत अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाचे कॉल सेंटर वर 8888007777 व इमेल आयडी complaint.igrmaharashtra.in यावर संपर्क साधावा.
Before You Go
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल





















