(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Water News: मोसमी पाऊस लांबल्यास कोल्हापुरात 'पाणीबाणी' अटळ; पाणीप्रश्नी जिल्हाधिकारी दोन दिवसात बैठक घेणार
Kolhapur Water News: राधानगरी धरणाची पाणीपातळी कमालीची घसरली आहे. त्यामुळे अजून आठवडाभर पाऊस लांबला गेल्यास कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पाणी कपातीचे संकट अटळ आहे.
Kolhapur Water News: रोहिणी नक्षत्रानंतर मृग नक्षत्रातील चार दिवस होऊनही पावसाने दडी मारली असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील (Kolhapur News) पाणी संकट गंभीर होत चालले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा आणि भोगावती या दोन नद्यांसह जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी तळ गाठला आहे. राधानगरी धरणाची पाणीपातळी कमालीची घसरली आहे. त्यामुळे अजून आठवडाभर पाऊस लांबला गेल्यास कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पाणी कपातीचे संकट अटळ आहे.
भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणीपातळी खालावल्याने कोल्हापूर शहरासाठी पाणी उपसा करणाऱ्या पंपांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर थेट परिणाम झाला आहे. कोल्हापूर शहरात टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण सुरु आहे. नदीतील पाणी कमी झाल्यानंतर राधानगरी धरणातून पाणी सोडले जाते. मात्र, यंदा राधानगरी धरणाने तळ गाठल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे. एकंदरीत नद्यांनी आणि धरणांनी सुद्धा तळ गाठल्याने आता शेतीऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य प्राधान्य दिले जाईल अशी शक्यता आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक
दुसरीकडे, पाणीप्रश्न गंभीर होत चालल्याने मनपा प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूरच्या पाणी प्रश्नासाठी दोन दिवसांत बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे. रेखावार म्हणाले की, पाऊस लांबल्याने धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. सध्याची स्थिती चिंताजनक नाही, उपसाबंदी पूर्ण क्षमतेनं सुरु आहे. पाऊस लांबल्यास गंभीर स्थिती होण्याची शक्यता आहे. यासाठी बुधवारी बैठक घेतली जाणार आहे.
राधानगरी धरणात 20 दिवस पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा
राधानगरी धरणामध्ये फक्त 20 दिवस पाणी पुरवठा पाणीपुरवठा होईल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा आणि उपसाबंदीचा पर्याय आहे. राधानगरी धरणातील पाणी कमी होण्याची सात वर्षांनी उद्भवली आहे. 2015 मध्ये राधानगरी धरणाने तळ गाठला होता. त्यावेळी फक्त अर्धा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता, त्यानंतर प्रथमच पाणी पाण्याची पातळी खाली गेली आहे. आज घडीला राधानगरी धरणातून 421 तुळशी धरणातून 300 आणि कुंभी धरणातून 250 क्युसेक पाणी सोडले जात आहे. मात्र, शेतीसाठी मोठा उपसा होत आहे. दरम्यान, कोल्हापूर शहराची पाणी गरज लक्षात घेऊन काळम्मावाडी धरणातील पाणी बोगद्यातून घेण्याचे नियोजन सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या