एक्स्प्लोर

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; निवडणुकीसाठी 9 हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी उद्या रविवारी मतदान होत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये मतदान होईल. 

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी (Kolhapur District Gram Panchayat Election) उद्या रविवारी मतदान होत आहे.  जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असल्याने प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतदान सुरळीत पार पडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात 9 हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये मतदान होईल. 

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेसाठी 3740 बॅलेट युनिट आणि 2799 कंट्रोल युनिट आज देण्यात येतील. जिल्ह्यातील एकूण 1827 केंद्र म्हणून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून 9135 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली. मात्र, 45 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता 429 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. सरपंच पदासाठी 1193 तर सरपंचपदासाठी, तर सदस्य पदासाठी 8915 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रविवारी होणारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी केली आहे. 

मतदान केंद्रांवर 144 कलम लागू 

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात उद्या होणाऱ्या 429 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार असल्याने मतदान केंद्रांवर 144 कलम लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश जारी केला आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात  राजकीय पक्षांचे बुथ लावणे,  प्रचार साहित्य बाळगणे तसेच मोबाईलचा वापरास प्रतिबंध असेल. 

पडद्यामागून हालचालींना वेग

दरम्यान, जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी (Kolhapur District Gram Panchayat Election) सुरु असलेल्या प्रचाराचा तोफा  शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. त्यामुळे आता पडद्यामागून हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये निवडणूक होत असल्याने अत्यंत इर्ष्येने प्रचार झाला. थेट सरपंचपदाची निवडणूक असल्याने या पदासाठी राजकीय नेत्यांनी सुद्धा प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आगामी विधानसभेसाठी गणित गृहित धरून आजी माजी आमदारांनी या निवडणुकीसाठी मोठी रसद पुरवली आहे. ज्या गावांमध्ये निवडणूक नाही त्या गावातील कार्यकर्तेही संवेदनशील गावांच्या प्रचारासाठी अखेरच्या दिवशी उतवरण्यात आले होते. अखेरच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी मतदारापर्यंत पोहोचण्यसाठी शक्य त्या सर्व मार्गाने प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यामुळे गलोगल्ली रिक्षा, कार्यकर्ते प्रचाराच्या शेवटच्या मिनिटांपर्यंत पायाला भिंगरी लावून फिरत होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget