Vishalgad Encroachment : विशाळगड हिंसाचारावर तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकणाऱ्याला मुंबईतून अटक; व्हिडिओ केला होता व्हायरल
विशाळगड हिंसाचारावरून दोन गटांमध्ये ते निर्माण करणारे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकाला मुंबईतील अंधेरीतून अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण मुक्तीला लागलेले हिंसक वळणामध्ये विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापुरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हिंसाचार झाला होता. या ठिकाणी प्रचंड नासधूस करण्यात आली होती. प्रार्थनास्थळावरही हल्ला करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमणामुळे चांगला वादामध्ये आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोणतीही जातीय तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट व्हायरल होऊ नयेत, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कलम 163 लागू करण्यात आलं आहे.
व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकाला अटक
कोल्हापूरमध्ये कलम लागू केलं असतानाच जाता मुंबईतून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. विशाळगड हिंसाचारावरून दोन गटांमध्ये ते निर्माण करणारे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकाला मुंबईतील अंधेरीतून अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद मासुम रजा शमीम शेख असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
विशाळगड हिंसाचार प्रकरणावरून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशा आशयाचा व्हिडिओ त्याने व्हायरल केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान विशाळगड प्रकरणावर कोणतेही जातीय तेढ निर्माण करणारी व्हिडिओ व्हायरल होऊ नये, यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कलम 163 लागू केलं आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट व्हायरल केल्यास थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
तर 19 जुलैला कोल्हापूर बंदची हाक
विशाळगड हिंसाचार प्रकरणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचे सांगितलं आहे. मात्र, आता एमआयएमच्या कोल्हापुरातील मोर्चाला सकल हिंदू समाजाने कडाडून विरोध दर्शवला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील, जर कोल्हापुरात आले तर त्यांचं कोल्हापुरी पायतानाने स्वागत करू, या घटनेविरोधात एमआयएमने कोल्हापुरात मोर्चा काढल्यास 19 जुलैला सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी दिला आहे. दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील एमआयएमच्या मोर्चाला परवानगी दिली जाऊ नये, याबाबत मी पोलिसांशी बोलणार असल्याचे म्हटले आहे. पोलिस याबाबत गाफील राहिले का याची देखील चौकशी करू, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या