एक्स्प्लोर

Narayan Rane on Ajit Pawar : अजित पवार पुण्यात येऊन बारा वाजवीन, माझ्या नादाला लागू नका; नारायण राणेंचा इशारा

Narayan Rane on Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाईनं पाडलं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर (Narayan Rane) बोचरा वार केला होता. यानंतर आता राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Narayan Rane on Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar on Narayan Rane) यांनी बाईनं पाडलं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर (Narayan Rane) बोचरा वार केला होता. यानंतर आता राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. अजित पवार यांचे पुण्यात येऊन बारा वाजवीन, माझ्या नादाला लागू नका, अशा शब्दात नारायण राणे यांनी अजित पवारांना इशारा दिला. नारायण राणे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. 

बारामतीच्या बाहेर जाऊन बारसे घालायचे बंद करा

नारायण राणे म्हणाले की, बारामतीच्या बाहेर जाऊन बारसे घालायचे बंद करा. अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळत मला माहीत नाही. ज्या प्रकारचा राजकारणी आहे त्याबद्दल बोलू नये. मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. महिला असेल, पुरुष असेल उमेदवार हा उमेदवार असतो. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावरूनही त्यांनी टोला लगावला. नामांतरावरून सगळेच श्रेय घ्यायला येतील. मी केलं, मी केलं, काय केलं तू? मराठी भाषेतील विशेषणं कुठेही वापरतो, असे ते म्हणाले. कोणता पक्ष संपायला मी काही जोतिष्य नाही, जे लोक काम करतात त्यांचा पक्ष टिकतो, बाकीचे संपून जातात, असेही त्यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरेंना टोला 

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहिलं आहे? कुठलंही अस्तित्व नाही, काही नाही. गेलेले लोक काय म्हणतात आपल्याबद्दल ते पहा. अडीच वर्षात आपण काय केलं ते पहा म्हणावं. 

काय म्हणाले होते अजित पवार?

चिंचवडमध्ये बोलताना अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका केली होती. शिवसेना फोडणारे आणि शिवसेनेला सोडून गेलेले कसे पराभूत झाले हे सांगताना त्यांनी राणेंना तर वांद्रेत बाईनं पाडलं असं अजित पवार म्हणाले. वांद्रे पोटनिवडणुकीत 2015 मध्ये त्यावळी काँग्रेस उमेदवार नारायण राणेंचा शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी पराभव केला होता. त्यामुळे अजित पवार बाईनं पाडलं म्हणत राणेंना डिवचले होते. संजय राऊत यांनी तोच मुद्दा पकडत ट्विट करून अजितदादांचं कौतुक केलं होतं. दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज नेता असाच असतो, एकदम मोकळा ढाकळा. सहज सोप्या भाषेत थेट संदेश जय महाराष्ट्र, असे ट्विट करत व्हिडिओ पोस्ट केला होता. 

पाहा व्हिडिओ : अजित पवार पुण्यात येऊन बारा वाजवीन, माझ्या नादाला लागू नका; नारायण राणेंचा इशारा

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget