एक्स्प्लोर
Kolhapur Crime : कंपाउंडच्या विद्युत तारेचा शाॅक लागून शिरोळ तालुक्यात दोन बैलांचा दुर्दैवी अंत
कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील घोसरवाडमध्ये शेतीच्या कंपाउंडला लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन बैलांचा करुण अंत झाला. या दुर्दैवी घटनेमध्ये दोन ग्रामस्थही जखमी झाले आहेत.

Kolhapur Crime
Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील घोसरवाडमध्ये शेतीच्या कंपाउंडला लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन बैलांचा करुण अंत झाला. या दुर्दैवी घटनेमध्ये दोन ग्रामस्थही जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. घोसरवाडमधील एका शेताच्या कंपाउंडला विद्युत तारा जोडण्यात आल्या आहेत. याच परिसरात बैल फिरत असताना त्या कुंपणाच्याजवळ गेल्याने त्यांना शाॅक लागला. या घटनेत दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. या घटनेत दोन ग्रामस्थही जखमी झाले.
आणखी वाचा























