एक्स्प्लोर

Uddhav Thackeray on Hasan Mushrif: ज्यांची पत्नी म्हणाली, आम्हाला गोळ्या घाल्या, तेच मुश्रीफ भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले; उद्धव ठाकरेंचा बोचरा बाण

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडाळी केल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून ईडीच्या रडारवर आणि अटकेची टांगती तलवार असलेल्या हसन मुश्रीफ यांनीही बंडखोरी करत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Uddhav Thackeray on Hasan Mushrif: शिवसेनेनंतर राष्ट्रवादी सुद्धा फोडण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. मुख्यमंत्री असताना मी घरात बसलो होतो, पण मी घरफोडी केली नाही, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला. उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपवर सडकून टीका केली. त्याचबरोबर शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, घरफोडे तुम्ही आहात. मी घरात बसून जे काम केलं, ते तुम्हाला घर फोडूनही करता येत नाही. त्यामुळे दारोदारी जावं लागत आहे. सरकार आपल्या दारी म्हणता, पण तुम्हाला कोणी दारातही उभं करत नाही. मग अंगणवाडी सेविकांना बोलवता, पोलिसांना साध्या कपड्यात बसवता.  

तेच मुश्रीफ भाजपसोबत गेले; उद्धव ठाकरेंचा बोचरा बाण 

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडाळी केल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून ईडीच्या रडारवर आणि अटकेची टांगती तलवार असलेल्या हसन मुश्रीफ यांनीही बंडखोरी करत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. ईडीच्या छापेमारीने त्रस्त झालेल्या मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी आम्हालाच एकदाच येऊन गोळ्या घालून जा, अशी हताश होऊन प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांना अश्रुही अनावर झाले होते. नेमका हाच धागा पकडत ठाकरे यांनी मुश्रीफांवर बोचरा बाण सोडला. उद्धव ठाकरेंनी अमरावतीमधील सभेत या प्रसंगाची आठवण करून देत तेच मुश्रीफ भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत जाऊन बसल्याची प्रतिक्रिया दिली. 

70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला तेच सोबत घेतले

जगभरातील  एक नंबरचे पंतप्रधान असतानाही पक्ष का फोडता? शिवसेना फोडली, चोरली आज राष्ट्रवादी चोरताय. भाजपवर ही वेळ का आली? असा सवालही त्यांनी केला. सत्तेची मस्ती असल्याने मनात भीती आहे, आपण निवडून येऊ शकत नाही म्हणून समोर कोणी ठेवायचं नाही, पक्ष फोडून सोबत घ्यायचं राजकारण सुरू असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला तेच सोबत घेतले. 

दरम्यान, हसन मुश्रीफांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा कायम आहे. 22 ऑगस्टच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे तपास यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मार्च महिन्यात अपेक्षित असलेला तपास अहवाल पुढील सुनावणीपूर्वी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तपास अधिकाऱ्यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोल्हापुरातील मुरगुड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात 23 फेब्रुवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुश्रीफांच्या तिन्ही मुलांनाही 19 जुलैपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांविरोधात ईडी मनी लाँड्रींग प्रकरणी चौकशी करत आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी हसन मुश्रीफांची मुलं जावेद, आबिद आणि नाविद यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget