(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शाहू महाराज आमच्या अस्मितेचा विषय, फक्त प्रचार नाही विजयी सभेलाही येणार; उद्धव ठाकरेंनी मशाल पेटवली!
Uddhav Thackeray meets Shahu Maharaj, Kolhapur : मी शाहू महाराजांच्या प्रचाराला येणार असं मी त्यांना वचन दिले आहे.
Uddhav Thackeray meets Shahu Maharaj, Kolhapur : "शाहू महाराजांच्या (Shahu Maharaj) प्रचाराला येणार असं मी त्यांना वचन दिले आहे. शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही," असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी तेजस ठाकरेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांची गळाभेट घेतली.
शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही
उद्धव ठाकरे म्हणाले (Uddhav Thackeray), ठाकरे कुटुंबिय आणि शाहू महाराज यांचे ऋणानुबंध अतूट आहेत. महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचे नाव लोकसभेसाठी जाहीर करण्यात आले आहे. शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. विजयी मेळाव्याला देखील मी येणार, असा शब्द शाहू महाराजांना दिलेला आहे. मीही शाहू महाराजांच्याकडे काहीतरी मागितलं आहे. त्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये शाहू महाराजांची साथ मिळावी, अशी इच्छा बोलून दाखवली आहे.
शाहू महाराजांच्या विजयी सभेलाही येणार
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले (Uddhav Thackeray), शाहू महाराजांना शिवसैनिक ताकदीने विजयी करतील कारण हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. मी फक्त आत्ताच आलोय. मी शाहू महाराजांचा प्रचार करणार आहे. शिवाय त्यांच्या विजयी सभेला देखील येणार आहे. आमच्या विजयासाठी मी त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे 1997 मध्ये इथे आले होते. त्यानंतर मी प्रथमच या ठिकाणी आलो आहे. आम्ही महाराजांना पूर्ण ताकदीने विजयी करणार आहोत.
शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी
महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष शाहू महाराज आमचेचं आहेत, असा दावा करताना दिसत आहे. यापूर्वी शरद पवार, संजय राऊत यांनी देखील शाहू महाराजांची भेट घेतली होती.
इतर महत्वाच्या बातम्या