Kolhapur Police : कोल्हापूर पोलिसमधील दोघांना शौर्यपदक जाहीर
कोल्हापूर पोलीस (Kolhapuur Police) दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील हवालदार नामदेवराव यादव यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे.
Kolhapuur Police : कोल्हापूर पोलीस (Kolhapuur Police) दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील हवालदार नामदेवराव यादव यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. उद्या प्रजासत्ताक दिनी शाहू स्टेडियमवर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंत आणि यादव यांना पदक देऊन गौरवण्यात येईल.
दरम्यान, राज्यातील चार अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रपती पोलिस पदक मिळवलेल्या चार पोलिस अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलिस उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे, तर 31 अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
तानाजी सावंत कोल्हापुरात गेली सहा वर्षे कार्यरत
पोलिस निरीक्षक तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथील आहेत. त्यांनी पीएसआयपासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. या कालावधीत महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांना अधिकारी म्हणून सेवा बजावण्याची संधी मिळाली. नाशिकमध्ये कार्यरत असताना त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या रेकॉर्डवरील एका गाव गुंडाचा एन्काऊंटर केला होता. कोल्हापुरात गेली सहा वर्षे ते कार्यरत आहेत.
लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यापासून ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतही त्यांनी गौरवास्पद कामगिरी केली. जिल्हा विशेष शाखेत सध्या ते कार्यरत आहेत. कुप्रसिद्ध बिश्नोई टोळीतील तिघा खतरनाक गुंडांनी पोलिसांवर हल्ला केला होता. किणी टोल नाक्यावर वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची ये जा सुरु असतानाही परिस्थितीचे भान ठेवून त्यांनी आपल्या पिस्तूलमधून बिश्नोई टोळीच्या दिशेन सहा राउंड फायर केले होते. त्यात बिश्नोई टोळीचे म्होरके जखमी झाले. त्यांना गजाआड करण्यात पोलीस निरीक्षक सावंत आणि त्यांच्या पथकाला यश आलं.
राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीतील खतरनाक गुन्हेगारांना अटक करण्यात कोल्हापूर पोलिस यशस्वी ठरले होते. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीमुळ महाराष्ट्र पोलीस दलाचं नाव देशात अभिमानान उंचावले गेले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि पोलीस हवालदार नामदेव यादव या दोघांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले.
इतर महत्वाच्या बातम्या