coronavirus : कोल्हापुरात 37 हजार बुस्टर डोस कचऱ्यात टाकून देण्याची वेळ!
Corona Booster Dose : कोल्हापूर जिल्ह्यात 37 हजारांवर डोस टाकून देण्याची वेळ आली आहे. आता नव्याने 20 हजार डोसची मागणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली असून ते नव्या वर्षात मिळतील.
coronavirus : चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा उद्रेक केल्यानंतर जगभरातून पुन्हा एकदा भीतीचे वातावरण आहे. कोरोना महामारीमधील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील हाहाकार पाहिल्यानंतर प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु करण्यात आले होते. पहिल्या आणि दुसऱ्या डोसला देशभरातून प्रतिसाद मिळाला होता. मात्र, कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर बुस्टर डोसकडे पाठ फिरवण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी बुस्टर डोस आता टाकून देण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही 37 हजारांवर डोस (Corona Booster Dose) टाकून देण्याची वेळ आली आहे. आता नव्याने 20 हजार डोसची मागणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली असून ते नव्या वर्षात मिळतील.
कोल्हापूरमधील आरोग्य विभागाकडे शिल्लक असलेल्या सुमारे 37 हजार बूस्टर डोसची मुदत डिसेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे कोणताही वापर न झाल्याने ते आता टाकून द्यावे लागणार आहेत. दोन डोसनंतर घेतल्यानतंर सहा महिने झाल्यानंतर सहा महिन्यांनी बुस्टर डोस देण्यात येत होता. मात्र, कोरोना संसर्ग कमी झाल्याने तसेच निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर लसीकरणाकडे पाठ फिरवली गेली.
आरोग्य विभागाकूडन लोकसंख्येच्या प्रमाणात डोसची मागणी केली होती. परंतु, पाच टक्केच लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. शिल्लक असलेल्या बुस्टर डोसची मुदत 31 डिसेंबर 2022 रोजी संपणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 90 ते 95 टक्के, तर 85 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला. मात्र, तुलनेत बूस्टर डोसलाफारसा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ पाच ते सहा टक्के नागरिकांनीच गोष्ट डोस घेतल्याने डोस शिल्लक राहिले. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाची टांगती तलवार असल्याने बूस्टर डोससाठी चौकशी होऊ लागली आहे.
कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती
दरम्यान, चीनमध्ये कोरोना प्रकोपनंतर राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना मास्क अनिवार्य केला आहे. दरम्यान, भाविकांसाठी अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, पण काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे कोल्हापूर विमानतळावरही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या