एक्स्प्लोर

Chandrakant Patil : कोल्हापुरातही This is Dhangekar म्हणत बॅनरबाजी; Who is धंगेकर म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचले! 

Chandrakant Patil : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऐन प्रचारात who is Dhangekar असा उल्लेख करत धंगेकरांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता.

Kolhapur News : पुण्यातील कसब्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धुळ चारली. या पराभवावरुन भाजपवर टीका होत असतानाच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरही टीका होत आहे. ऐन प्रचारात त्यांनी Who Is Dhangekar असा उल्लेख करत धंगेकरांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हाच धागा पकडून आता पुण्यामध्ये This is Dhangekar बॅनर लागले आहेत. आता त्याच पद्धतीने कोल्हापुरातही लावून चंद्रकांत पाटील यांना डिवचण्यात आलं आहे. शहरातील कावळा नाका चौक परिसरात This is Dhangekar म्हणत महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

दुसऱ्याला मात्र खालच्या पातळीवर बोलतात 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रचारामध्ये सर्वसामान्य घरातील असलेल्या धंगेकर यांचा अपमानास्पद उल्लेख केला होता. म्हणूनच हे होर्डिंग लावल्याचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे. स्वतःला गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून घेतात आणि दुसऱ्याला मात्र खालच्या पातळीवर बोलतात, अशी टीकाही त्यांनी केली. 2024 मध्येही अशाच पद्धतीचे चित्र पाहायला मिळेल, असं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

भाजपने कसब्यातून रवींद्र धंगेकरांना पराभूत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. रोड शो, प्रचारसभा, कोपरा सभा घेतल्या होत्या. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील मैदानात उतरले होते. मुख्यमंत्र्यांनी रोड शो केला होता. या प्रचारादरम्यान चंद्रकांत पाटलांनी प्रचार सभेत रवींद्र धंगेकरांवर टीका केली होती. भरसभेत हू इज धंगेकर, तो आमच्यासमोर टिकू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर धंगेकरांचे समर्थक पेटून उटले होते. त्यांनी सगळ्या कसब्यात पुणेरी पाट्या लावल्या. विजयानंतर त्यांनी कविताही व्हायरल करुन चंद्रकात पाटलांना उत्तर दिलं. धंगेकर नाऊ MLA असं आता सगळीकडे व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेली कविता

Who is dhangekar?
ज्याने पाडला गणेश बिडकर,
केला गड सर,
Who is dhangekar?
ज्याने वाटायला लावले,
चांदीच्या विटा, सोन्याचे डॉलर,
Who is dhangekar?
प्रचाराला लावले RSS चे केडर,
भले-भले मोठे बिल्डर,
Who is dhangekar?
देशाचे नेते फिरवले गल्लीभर,
धास्तीने जागेच रात्रभर,
Who is dhangekar?
ज्याने अश्रू आणले ओठांवर,
बंगल्याचे ओझे पेठांवर,
Who is dhangekar?
ज्याने आठवायला लावले पुण्येश्वर,
नदीत उतरून पहाय लावले ओंकारेश्वर,
Who is dhangekar?
जबरदस्तीने पैसे वाटतो हरिहर,
नाकारता हात उचलतो आया-बहिणींवर,
Who is dhangekar?
घाम फुटलाय ज्याच्या धाकावर,
ज्याने खोबऱ्याचे तेल आणलय कपाळावर, नाकावर.
कळले का?

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget