Kolhapur Crime : बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडत मुसक्या आवळल्या
6 लाख रुपये किंमतीच्या बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली . दिंडनेर्ली (ता.करवीर) फाट्याजवळ सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले.
![Kolhapur Crime : बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडत मुसक्या आवळल्या The two smugglers of leopard skins were caught red-handed in kolhapur Kolhapur Crime : बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडत मुसक्या आवळल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/29/e5b4a18efea1b18a667bea51630be803_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur Crime : तब्बल 6 लाख रुपये किंमतीच्या बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दिंडनेर्ली (ता.करवीर) फाट्याजवळ सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. बाजीराव श्रीपती यादव (वय ३९, रा. सोनुर्ले,ता. भुदरगड) व ब्रम्हदेव शशिकांत पाटील (वय ३२, रा.किटवडे, ता. आजरा) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी तसेच प्राण्यांची शिकार करणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी विविध पथके तयार केली आहेत. अंमलदार संभाजी भोसले यांना दोघेजण बिबट्याच्या कातड्याची तस्करी करण्यासाठी गारगोटीहून दिंडनेर्लीकडे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले.
पोलिस निरीक्षक गोर्ले यांनी अंमलदार संभाजी भोसले, राजीव शिंदे, खंडेराव कोळी, बालाजी पाटील यांच्या पथकाने सापळा रचत संशयित बाजीराव यादव व ब्रम्हदेव पाटीलला ताब्यात घेतले. दोघा संशयितांना इस्पूर्ली पोलिसांकडे रवानगी करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra Rain Alert : कोल्हापूर, सातारमध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
- Maharashtra Rain : पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा , मुंबईसाठी यलो अलर्ट
- कोल्हापूर जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? संभाव्य यादीत नावे आली समोर!
- Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील पालकमंत्रिपदासाठी कोल्हापूरला पसंती देणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)