एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Cabinet : कोल्हापूर जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? संभाव्य यादीत नावे आली समोर!

Devndra Fadnavis Cabinet : कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी सरकारमध्ये सतेज पाटील गृह राज्यमंत्री, हसन मुश्रीफ ग्रामविकास, तर अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आरोग्य राज्यमंत्री होते.

Devendra Fadnavis : राज्यपालांच्या आदेशानंतर विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. त्यामुळे राज्यामध्ये आता बंडखोर शिंदे गटाच्या पाठिंब्याने भाजप सरकार सत्तेत शिक्कामोर्तब झालं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मंत्रिपद कोणाला मिळणार? याबाबत अजून जाहीरपणे सांगण्यात आले नसले, तरी संभाव्य मंत्र्यांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. यामध्ये बहुतांश मागील फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच मागील सरकारमधील काही चेहरे डावलले जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, समोर आलेल्या संभाव्य यादीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून फडणवीस यांच्यासोबत असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अशिष शेलार, प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, राणाजगजितसिंह पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातून कोणाला मिळणार याची उत्सुकता 

कोल्हापूर जिल्ह्यातून मंत्रिपद कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सतेज पाटील यांच्याकडे गृह राज्यमंत्री पद होते तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होते. त्याचबरोबर हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास मंत्रिपद होते, तर शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रिपद होते. 

भाजपकडून आमदार विनय कोरे यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळात त्यांचा नावाचा समावेश आहे.  2019 मध्ये त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.  आमदार प्रकाश आवाडे यांनीही भाजपला पाठिंबा दिला होता. 

आता भाजप आणि शिंदे गटाकडून कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून शिंदे गटाला शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचा समावेश आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून प्रकाश आबिटकर किंवा राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना संधी मिळते का? याची चर्चा आहे. शिंदे गटाकडून प्रकाश आबिटकर यांचे पारडे जड मानले जात आहे.

संभाव्य मंत्र्याची नावे खालीलप्रमाणे आहेत 

कॅबिनेट 

  • देवेंद्र फडणवीस 
  • चंद्रकात पाटील
  • सुधीर मुनगंटीवार
  • गिरीश महाजन
  • आशिष शेलार
  • प्रवीण दरेकर
  • प्रसाद लाड
  • रवींद्र चव्हाण
  • चंद्रशेखर बावनकुळे
  • विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
  • गणेश नाईक
  • राधाकृष्ण विखे पाटील
  • संभाजी पाटील निलंगेकर
  • राणा जगजितसिंह पाटील
  • संजय कुटे  
  • डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित 
  • सुरेश खाडे
  • जयकुमार रावल
  • अतुल सावे
  • देवयानी फरांदे
  • रणधीर सावरकर
  • जयकुमार गोरे
  • विनय कोरे, जनसुराज्य
  • परिणय फुके 
  • राम शिंदे किंवा गोपिचंद पडळकर

हे राज्यमंत्री होण्याची शक्यता

  • नितेश राणे
  • प्रशांत ठाकूर
  • मदन येरावार
  • महेश लांडगे किंवा राहुल कुल
  • निलय नाईक
  • गोपीचंद पडळकर

शिंदे गटाकडून यांची नावे चर्चेत

कॅबिनेट मंत्री

  • एकनाथ शिंदे
  • गुलाबराव पाटील
  • उदय सामंत
  • दादा भुसे
  • अब्दुल सत्तार
  • शंभूराज देसाई
  • बच्चू कडू
  • तानाजी सावंत
  • दीपक केसरकर

राज्यमंत्री

  • संदीपान भुमरे
  • संजय शिरसाट
  • भरत गोगावले

इतर महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election : 'गोकुळ'साठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढणार, भाजप-शिवसेना समसमान जागा
'गोकुळ'साठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढणार, भाजप-शिवसेना समसमान जागा
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget