Shivsena Maha Adhiveshan : शिवसेनेच्या महा अधिवेशनात पीएम मोदी आणि अमित शाहांच्या कौतुकासह सहा ठराव
शिंदे गटाच्या महा अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार, खासदार विविध आघाड्यांच्या नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत. महासैनिक दरबार हॉलमध्ये शिंदे गटाचे महाधिवेशन होत आहे.
कोल्हापूर : शिवसेना शिंदे गटाचे महा अधिवेशन कोल्हापूरमध्ये होत आहे. शिंदे गटाच्या महा अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार, खासदार विविध आघाड्यांच्या नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत. कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे महाधिवेशन होत आहे. अधिवेशनाची सांगता जाहीर सभेनं होणार आहे. आजच्या पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये शिंदे गटाकडून सहा ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कामगिरीसाठी अभिनंदन त्याबरोबर देशात सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या बहुमोल कामगिरीसाठी अभिनंदन, राम मंदिर प्रतिष्ठापनेसह सहा ठराव मांडण्यात आले.
शिंदे गटाच्या अधिवेशनातील ठराव
- पीएम मोदी यांच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीसाठी अभिनंदन
- सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी अभिनंदन
- राम मंदिर सोहळा
- लोकसभा निवडणुकीत मिशन 48 म्हणजेच सर्व 48 जागांवर महायुती विजयी होणे. या दृष्टीने सर्व निर्णय आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व संसाधनांची व्यवस्था करण्यासाठी सर्वाधिकार
- मिशन 48 शपथ
- बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेसाठी कार्य केलेल्या शिवसेना नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वार्षिक सात पुरस्कार देण्यचा निर्णय.
1) यामध्ये शिवसेना नेता दत्ताजी सळवी या नावाने उत्कृष्ट कामगार पुरस्कार दिला जाईल
2) शिवसेना नेता सुधीर जोशी यांच्या नावाने नाविन्यपूर्ण उभारता उद्योजक पुरस्कार दिला जाईल
3) प्रमोद नवलकर यांच्या नावाने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दिला जाईल
4) शिवसेना नेता दत्ता नलवडे यांच्या नावाने आदर्श शिवसैनिक पुरस्कार दिला जाईल
5) दादा कोंडके यांच्या नावाने कला क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार दिला जाईल
6) शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार शिवसेना नेते वामनराव महाडिक यांच्या नावाने दिला जाईल
7) उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार शिवसेना नेते शरद भाऊ आचार्य यांच्या नावाने दिला जाईल
हे पुरस्कार शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर होतील आणि या पुरस्काराचे वितरण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण होईल.
लोकसभेची निवडणूक आम्ही महायुतीमध्येच लढवणार
दरम्यान, महा अधिवेशनात पहिल्या सत्रात बोलताना उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, कामगार क्षेत्रात कस काम केलं पाहिजे याच मार्गदर्शन किरण पावसकर यांनी केलं. पूर्वेश सरनाईक यांनी युवा सेनेच्या वाटचालीवर भाष्य केलं. ते पुढे म्हणाले की, अधिवेशनात वेगवेगळे सहा ठराव मांडण्यात आले. लोकसभेची निवडणूक आम्ही महायुती मध्येच लढवणार आहे. मिशन 48 यशस्वी करण्याचा ठराव केला आहे. शिवसेनेला मोठं करण्यासाठी अनेकांचा हातभार लागला, पण काहींना त्याचा विसर पडला. मात्र, असं काम करण्याच्या नावाने पुरस्कार देण्याचा ठराव आजच्या आधिवेशनात झाल्याचे ते म्हणाले. आमचे उमेदवार कमळ चिन्हावर लढण्याचा प्रश्नच नाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याचं उत्तर दिलं असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या