एक्स्प्लोर

Kolhapur Worst Road : अधिकारी आधी टक्केवारी घ्यायचे आता तेच ठेकेदारांचे पार्टनर आहेत का? संजय पवारांचा सवाल

गुडघाभर खड्ड्यात गेलेल्या कोल्हापूर शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पर्यटकांची संख्या वाढत चालली असल्याने त्यांचे स्वागत गुडघाभर खड्ड्यात आणि फुटभर वरती आलेल्या ड्रेनेजच्या झाकणांनी होत आहे.

Kolhapur Worst Road : गुडघाभर खड्ड्यात गेलेल्या कोल्हापूर शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कोल्हापुरात पर्यटकांची संख्या वाढतच चालली असल्याने त्यांचे स्वागत गुडघाभर खड्ड्यात आणि फुटभर वरती आलेल्या ड्रेनेजच्या झाकणांनी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. 

कोल्हापुरातील रस्त्यांच्या संदर्भातील प्रकार भयानक असल्याचे ते म्हणाले. आंदोलन झाली, बातम्या झाल्या तरी प्रशासन लक्ष का देत नाही? अधिकारी आधी टक्केवारी घ्यायचे आता तेच ठेकेदारांचे पार्टनर आहेत का? अशी शंका आहे. ठेकेदारांचे लाड का केले जातात? केवळ एक नोटीस द्यायची आणि बाजूला व्हायचं असं चाललं आहे. पर्यटनाला आलेले नागरिक कोल्हापूरला नावं ठेऊन जात आहेत. कोल्हापूर आहे की खड्डेपूर असं नागरिक म्हणतात. पहिल्यांदा शहर अभियंता नेत्रदी सरनोबत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी संजय पवारा यांनी केली. 

कोणत्याही परिस्थितीत कर्नाटक भवन होऊ देणार नाही

मुंबई ही कुणाच्या बापाची नाही, आमचं नाक आहे. कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अशी वक्तव्य केली जातात.  कर्नाटकच्या नेत्यांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. विकासासाठी कितीही पैसे द्या आम्ही स्वागत करू, राष्ट्रपती, पंतप्रधान कणेरी मठावर आले तर स्वागतच आहे, पण कोणत्याही परिस्थितीत कर्नाटक भवन होऊ देणार नाही. कर्नाटक नाव मठाला लागणार नाही याची शपथ आम्ही घेतली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता जिल्हाधिकारी यांनी घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला. 

सांगून या ना महापालिकेत येतो

संजय पवार यांनी शिंदे गटावरही टीका केली. ते म्हणाले, दबाव टाकण्याच्या शिवाय शिंदे गट काय करू शकतो?  विकासावर हे बोलू शकत नाहीत, विकासाचे मुद्दे गुजरातला गेले आहेत. दुसरे काय करायचे तर शिवसेनेवर दबाव टाकायचा. महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्या वेळी शिवसेनेवर दबाव टाकला त्यावेळी शिवसेना चौपट वाढली आहे. निवडणुका होऊ दे मग कळेल. सांगून या ना महापालिकेत येतो, सेना भवन जवळ येतो, जे जे आले त्यांना हिसका दिला आहे, कुठं गेले भोंगेवाले, कुठं गेले हनुमान चालीसा वाले? असा टोलाही त्यांनी लगावला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget