Shiv sena morcha against MP Sanjay Mandlik : बंडखोर खासदार संजय मंडलिकांच्या घरावर गुरुवारी शिवसैनिकांचा मोर्चा धडकणार
संजय मंडलिक यांच्या घरावर उद्या शिवसैनिकांचा मोर्चा धडकणार होता. मात्र, उद्या मोहरम सण असल्याने हा मोर्चा गुरुवारी काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली आहे.
Shiv sena morcha against MP Sanjay Mandlik : बंडखोर खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर उद्या शिवसैनिकांचा मोर्चा धडक देणार होता. मात्र, उद्या मोहरम सण असल्याने हा मोर्चा स्थगित करण्यात आला असून आता तो गुरुवारी काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली आहे. खासदार संजय मंडलिक यांनी बंडखोर एकनाथ शिंदे कळपात सहभाग सहभागी झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यात बंडखोरी केलेल्या प्रत्येक आमदार खासदारांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा धडकला आहे.
त्यामुळे आता संजय मंडलिक यांच्या घरावरही मोर्चा शिवसेनेकडून नेण्यात येणार आहे. उद्या या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, पण उद्याचा मोर्चा गुरुवारी निघणार आहे. मोहरम असल्याने कोणत्याही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस शैलेश बलकवडे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार तसेच विजय देवणे यांच्याशी चर्चा केली आणि दोन दिवसानंतर मोर्चाचा निर्णय घ्यावा अशी विनंती केली. त्यामुळे गुरुवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.
गेले ते बेटेक्स राहिले ते सोनं म्हणणारे तसेच बंडखोरांविरोधात पहिला मोर्चा काढणाऱ्या कोल्हापूर खासदार संजय मंडलिक यांनी शांतीत क्रांती करत एकनाथ शिंदेंच्या कळपात सामील झाले. त्यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यामध्ये संतप्त पडसाद उमटले होते. निवडून आले सहा मतदारसंघातून आणि निर्णय घेतला कागलमधून अशीही टीका त्यांच्यावर झाली. या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह मतदारही सहभागी होतील, असा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केला आहे. गद्दारीबद्दल मंडलिकांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या