(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे गटाने खातं खोललं; भुदरगड तालुक्यात फये ग्रामपंचायतीत शिंदे गटाची सत्ता
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये मतमोजणी होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील फये ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाने सत्ता मिळवली आहे.
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये मतमोजणी पार पडत आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील फये ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाने सत्ता मिळवली आहे. सरपंचपदी शिंदे गटाच्या नकुशी धुरे विजयी झाल्या आहेत. यामध्ये 7 पैकी 3 जागा शिंदे आणि भाजप गटाने जिंकल्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं 4 जागा जिंकल्या आहेत. मात्र सरपंच शिंदे आणि भाजप गटाचा विजयी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदे गट आणि भाजप यांच्यात लढत झाली.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर बंडखोरी शिंदे गटात सामील झाले आहेत. फये ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या गटाने बाजी मारली आहे. दरम्यान, आजरा तालुक्यातील करपेवाडी, चंदगड तालुक्यातील इसापूर आणि राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या