एक्स्प्लोर

Sharad Pawar : मविआचं लोकसभेच्या 39 जागांवर एकमत, शाहू महाराज कोल्हापुरातून उमेदवार असल्यास मला आनंद : शरद पवार

Sharad Pawar In Kolhapur : "महविकास आघाडीचे लोकसभेच्या 39 जांगावर एकमत झालं आहे. लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज उमेदवार असतील तर मला आनंद होईल.  शाहू महाराजांच्या उमेदवारी बाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल.

Sharad Pawar In Kolhapur : "महविकास आघाडीचे लोकसभेच्या 39 जांगावर एकमत झालं आहे. लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज उमेदवार असतील तर मला आनंद होईल.  शाहू महाराजांच्या उमेदवारी बाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे. कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल", असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत. शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी ते सहमत आहेत. ते राजकीय पक्षात सामील झालेलं त्यांना पाहिलेलं नाही, असं शाहू महाराज यांच्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी न्यू पॅलेस येथे भेट घेतली यावेळी ते बोलत होते. 

महायुतीला शरद पवारांचा उपरोधित टोला

शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या 39 जागांवर एकमत झालं आहे. दोन ते तीन जागांबद्दल खलबत्त सुरू आहेत मी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून या जागांबद्दल निर्णय घेऊ. भाजप देशात 400 पेक्षा जास्त आणि राज्यात 40 पेक्षा जास्त जागा सांगत आहे. मला वाटतं हे खूप कमी आकडे सांगत आहेत, असा उपरोधित टोलाही शरद पवारांनी लगावला. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, येथे शिवछत्रपतींचा पुतळा होता. तो पुतळा शाहू महाराजांनी बसवला होता. कालच्या कार्यक्रमाला मालोजीराजे आणि शाहू महाराज येणार होते. मात्र ते येऊ शकले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी मी कोल्हापुरात कार्यक्रमात येणार होतो. त्यावेळी त्यांची भेट घ्यावी, असं मी म्हणालो. मी ठरवलं की काल त्यांची भेट झाली नाही. तर आज कोल्हापुरात आलो तर भेट घ्यावी. 

मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले शरद पवार ?

आम्हा लोकांचे सरकार होते. ते उच्च न्यायालयात गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, असे शरद पवार मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना म्हणाले. ज्यांनी मराठा आरक्षणाबाबत सुरु केला. ते उद्या याबाबत बोलणार आहेत. त्यामुळे ते बोलल्यानंतरच मी त्याबाबत माझे मत मांडेल, असे शरद पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

MNS on Teachers Election Duty : वर्ष संपत आलंय, शाळेत शिकवायला कोणी नाही; शिक्षकांच्या ड्यूटीबाबत मनसेचं निवडणूक आयोगाला निवेदन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात! ऊसतोड कामगारांना 50 हजार घरे मिळणार, विक्रमी वेळेत काम पूर्ण
बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात! ऊसतोड कामगारांना 50 हजार घरे मिळणार, विक्रमी वेळेत काम पूर्ण
IND vs AUS : विराट कोहली ॲडिलेडचा किंग, दमदार रेकॉर्डचा ऑस्ट्रेलियाला धसका, दुसऱ्या वनडेत टीम इंडिया कमबॅक करणार?
किंग कोहली ॲडिलेडचा राजा, विराटच्या रेकॉर्डचा ऑस्ट्रेलियाला धसका, टीम इंडिया कमबॅक करणार? 
WI vs BAN : वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम, पुरुष वनडे मॅचमध्ये 50 ओव्हर फिरकीपटूंनी टाकल्या, क्रिकेट इतिहासात पहिली घटना
ऐकावं ते नवल...वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम,  बांगलादेश विरुद्ध 300 बॉल फिरकीपटूंनी टाकले  
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Paris Heist:लूव्र म्युझियममध्ये दिवसाढवळ्या दरोडा, कोट्यवधींचे दागिने चोरीला
Special Report Goregaon Fire: गोरेगावमध्ये रॉकेटमुळे मोठी आग, प्रसिद्ध हॉलचं नुकसान
Bonus Row: 'गेल्या वर्षी 5000, यंदा 1100 रुपये का?', Agra-Lucknow Expressway वर कर्मचाऱ्यांचा संताप
BJP Infighting: 'कलंकित आणि भ्रष्टाचारी नेत्याला प्रवेश देणार?', Solapur मध्ये Dilip Mane यांच्यावरून भाजपमध्येच राडा
Jarange's Ultimatum: 'सरकारचे कपडे फाडावे लागतील', Manoj Jarange यांचा शेतकऱ्यांसाठी नवा लढा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात! ऊसतोड कामगारांना 50 हजार घरे मिळणार, विक्रमी वेळेत काम पूर्ण
बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात! ऊसतोड कामगारांना 50 हजार घरे मिळणार, विक्रमी वेळेत काम पूर्ण
IND vs AUS : विराट कोहली ॲडिलेडचा किंग, दमदार रेकॉर्डचा ऑस्ट्रेलियाला धसका, दुसऱ्या वनडेत टीम इंडिया कमबॅक करणार?
किंग कोहली ॲडिलेडचा राजा, विराटच्या रेकॉर्डचा ऑस्ट्रेलियाला धसका, टीम इंडिया कमबॅक करणार? 
WI vs BAN : वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम, पुरुष वनडे मॅचमध्ये 50 ओव्हर फिरकीपटूंनी टाकल्या, क्रिकेट इतिहासात पहिली घटना
ऐकावं ते नवल...वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम,  बांगलादेश विरुद्ध 300 बॉल फिरकीपटूंनी टाकले  
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
Asia Cup Trophy : मोहसीन नक्वीचं नवं नाटक, BCCI च्या कोणत्याही प्रतिनिधीला ट्रॉफी देणार, भारत ICC कडे जाणार
बीसीसीआयच्या कोणत्याही प्रतिनिधीनं दुबईत यावं, माझ्या हातानं ट्रॉफी देतो, मोहसीन नक्वीचा नवा डाव, भारत ICC कडे दाद मागणार
Tata Trust : टाटा ट्रस्टमध्ये मतभेद असताना मोठी अपडेट, वेणू श्रीनिवास यांची आजीव ट्र्स्टी म्हणून निवड, मेहली मिस्त्रींचं काय होणार
टाटा ट्रस्टमध्ये मतभेद असताना मोठी अपडेट, वेणू श्रीनिवास यांची आजीव ट्र्स्टी म्हणून निवड
Muhurat Trading:मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीवर काय घडलं? सर्वाधिक फायदा अन् फटका कुणाला? जाणून घ्या
मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी बाजाराची सकारात्मक सुरुवात, सेन्सेक्स अन् निफ्टीवर काय घडलं? 
Embed widget