एक्स्प्लोर

Ajit Pawar camp NCP: मोठी बातमी: अजितदादा गटाला कोल्हापुरात मोठा झटका? माजी आमदार के पी पाटील मविआच्या वाटेवर

Maharashtra Politics: लोकसभेच्या निकालानंतर वारं फिरलं, अजितदादा गटाचा बडा नेता महाविकास आघाडीत प्रवेश करण्याची शक्यता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात मविआची ताकद वाढणार आहे.

कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीतील निराशानजक कामगिरीनंतर टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवार यांना आता आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजितदादा गटातील (Ajit Pawar Camp) एक बडा नेता महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात नव्या जोमाने उतरण्याच्या तयारीत असलेल्या अजित पवार यांच्या मनसुब्यांना धक्का बसू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील बिद्री कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के.पी. पाटील (K P Patil) हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

के.पी. पाटील यांनी अलीकडेच राज्य सरकार आणि महायुतीवर सडकून टीका केली होती. त्यांचा एकूण रागरंग पाहता ते विधानसभा निवडणुकीपूर्वी मविआ आघाडीतील एका पक्षात प्रवेश करु शकतात. कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांच्यानंतर के.पी. पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वात मोठे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर के पी यांची  महाविकास आघाडीशी जवळीक वाढल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आगामी काळात के पी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यास तो अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का ठरेल.

के.पी. पाटील 'या' कारणामुळे मविआच्या वाटेवर

के.पी. पाटील हे अजितदादांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठे नेते मानले जातात. मात्र, आता ते महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. कारण राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर हे आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे, हे निश्चित आहे. अशावेळी आपल्याला आमदारकी लढवायची असेल तर आपल्याला मविआ आघाडीशिवाय पर्याय नाही, हे  के.पी. पाटील यांच्य लक्षात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच मविआने कोल्हापूरमध्ये मोर्चा काढला होता, त्यामध्येही के.पी. पाटील सहभागी झाले होते. शाहू महाराज यांनी आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी राधानगरी-भुदरगड मतदारसंघात गेले होते, तेव्हा के.पी. पाटील यांनी शाहू महाराजांचे स्वागत केले. त्यामुळे के.पी. पाटील यांची मविआच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचे चित्र आहे. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा के.पी. पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की, आपण शरद पवार यांच्यासोबत राहिले पाहिजे. मात्र, के.पी. पाटील यांनी बिद्री साखर कारखान्याच्या काही परवानग्यांसाठी आपण सत्तेसोबत जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, आता लोकसभेच्या निकालानंतर आता त्यांची पावलं पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या दिशेने पडत असल्याचे दिसत आहे. 

आणखी वाचा

आधी बळीचा बकरा बनवलं,आता अजितदादांना बाहेर पडण्यास भाग पाडायचं, हीच चाणक्यांची रणनीती, रोहित पवारांचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Uttar Vidhan Sabha : संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
Pandharpur: पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम,नक्की प्रकरण काय?
पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम, नक्की प्रकरण काय?
Maharashtra Assembly Election 2024 : वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
Pune Station : पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Charan Waghmare Bhandara : भाजपने काढल्यानंतर आमदार चरण वाघमारे महाविकास आघाडीच्या वाटेवर?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 28 Sepember 2024ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 28 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Uttar Vidhan Sabha : संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
Pandharpur: पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम,नक्की प्रकरण काय?
पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम, नक्की प्रकरण काय?
Maharashtra Assembly Election 2024 : वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
Pune Station : पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
Dhangar Reservation : मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
Sant Dnyaneshwar: राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
Savner Assembly Constituency: सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
Maharashtra Assembly Election 2024 : 'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Embed widget