Kolhapur VIDEO : यांच्यासमोर सही कर, शाहू महाराजांचा आदेश, मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंना खेचून बाहेर आणले; कोल्हापुरात काय-काय घडलं?
Madhurima Raje Chhatrapati VIDEO : लढायचं नव्हतं तर आधीच सांगायचं होतं, मला कशाला तोंडघशी पाडलं अशी नाराजी सतेज पाटलांनी शाहू महाराजांसमोर व्यक्त केली.
कोल्हापूर : अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोल्हापुरात जोरदार राजकीय राडा झाल्याचं दिसून आलं. कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंनी शेवटच्या क्षणी अर्ज माघार घेतला. महाविकास आघाडी आणि सतेज पाटलांसाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातंय. मधुरिमाराजेंच्या अर्ज माघारीसाठी प्रत्यक्ष शाहू महाराजांचाच दबाव असल्याचं समोर आलं. शाहू महाराजांच्या आदेशानंतर मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंचा हात पकडत बाहेर आणलं आणि उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्या ठिकाणचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होतोय.
कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी आधी माजी नगरसेवक राजू लाटकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र काँग्रेसने एका दिवसात उमेदवारी बदलली आणि मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. मात्र एकाच घरात दोन दोन पदं नको अशी भूमिका शाहू महाराजांची होती अशी माहिती आहे. त्यामुळेच शाहू महारांच्या आदेशानंतर मधुरिमाराजे छत्रपती यांनी शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा आहे.
Satej Patil Kolhapur VIDEO : जिल्हाधिकारी कार्यालयात काय घडलं?
काँग्रेसचे बंडखोर राजू लाटकर यांनी माघार घेण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेससमोर पेच निर्माण झाला होता. त्या दरम्यान, राजू लाटकर यांनी शाहू महाराजांची दोन वेळा भेट घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर मधुरिमाराजे यांनी उमेदवारी मागे घेतली.
मधुरिमाराजे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शाहू महाराजांनी आदेश दिला. मधुरिमाराजेंनी मालोजीराजेंसमोर माघारी अर्जावर सही करण्याचे आदेश शाहू महाराजांनी दिले. त्यानंतर मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंचा हात पकडला आणि त्यांना घेऊन बाहेर आले. त्यानंतर मधुरिमाराजेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.
मला कशाला तोंडघशी पाडलं?
यादरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सतेज पाटलांचा पारा मात्र चांगलाच चढल्याचं दिसून आलं. त्यांनी शाहू महाराजांसमोर नाराजी व्यक्त केली. लढायचं नव्हतं तर आधीच सांगायचं होतं, मला कशाला तोंडघशी पाडलं असं त्यांनी विचारलं. माझी फसवणूक केली, हे काही बरोबर झालं नाही असंही ते म्हणाले.
ज्या लोकांनी आग लावण्याचं काम केलं त्यांना सोडणार नाही असा दमही सतेज पाटलांनी शाहू महाराजांच्या अवती-भोवती असणाऱ्या लोकांना दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर आल्यानंतरही ते भडकले. 'जर तुमच्यात दम नव्हता तर कशाला उभं राहिलात, मी पण माझी ताकद दाखवली असती' असं सतेज पाटलांनी शाहू महाराजांच्या जवळच्या लोकांना उद्देशून म्हटलं.
ही बातमी वाचा: