एक्स्प्लोर

Samarjit Ghatge : समरजीत घाटगेंच्या पक्षप्रवेशावेळी कागलच्या गैबी चौकात किती गर्दी?

Samarjit Ghatge Joins NCP Sharad Pawar Party : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातले एक प्रमुख नेते समरजीत घाटगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

कोल्हापूर : आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातून पहिली खेळी केली असून समरजीत घाटगेंसारखा मोठा मोहरा आपल्या पक्षात घेतला आहे. विधानसभेसाठी रणशिंग फुंकलेल्या समरजीत घाटगेंनी कागलच्या गैबी चौकातील कार्यक्रमात शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी तालुक्यातून हजारोंच्या संख्येने तरुणांनी हजेरी लावल्याचं दिसून आलं. गैबी चौक इतका खचाखच भरला होता की पाय ठेवायलाही जागा नव्हती.  

या आधी गैबी चौकात तब्बल दहा वर्षांपूर्वी शरद पवारांनी हसन मुश्रीफ यांच्यासाठी सभा घेतली होती. आता त्यांच्या विरोधात लढणाऱ्या समरजीत घाटगेंना बळ देत शरद पवारांनी गैबी चौकात हजेरी लावली. 

कागलचा गैबी चौक ऐतिहासिक 

कागल शहराला ऐतिहासिक असं महत्व आहे. देशाला सामाजिक समतेचा संदेश देणारे शाहू महाराज यांचे मूळ गाव कागल. त्यामुळे शरद पवारांचे या मतदारसंघावर पहिल्यापासून लक्ष. या मतदारसंघातून एकेकाळी शरद पवारांचे शिष्य समजल्या जाणारे हसन मुश्रीफ हे पाच वेळा निवडून आले आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीत मुश्रीफांनी अजितदादांची साथ दिली. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कागलची जागा राखायचीच या इर्षेने शरद पवारांनी थेट समरजीत घाटगेंना पक्षात घेतलं. 

समरजीत घाटगे हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जायचे. पण त्यांनी आता तुतारी फुंकत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. कुंपणावर असलेल्या राज्यातील अनेक नेत्यांना एक प्रकारचा राजकीय संदेश देणारा हा पक्षप्रवेश कागलच्या प्रसिद्ध गैबी चौकातच झाला पाहिजे अशी शरद पवारांची इच्छा होती. त्यामुळेच याच चौकात समरजीत घाटगेंचा पक्षप्रवेश करण्यात आला. 

विधानसभेची शेवटची सभाही गैबी चौकातच

समरजीत घाटगेंच्या पक्षप्रवेशाची सभा ज्या गैबी चौकात झाली त्याच चौकात विधानसभेची शेवटची सभा घेतली जाईल असं समरजीत घाटगेंनी सांगितलं. समरजीत घाटगे म्हणाले की, यंदा विधानसभा निवडणुकीतील शेवटची सभा गैबी चौकातच होणार. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच उपस्थिती रहावे. कारण मागच्या वेळी याच गैबी चौकातून त्यांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला. यंदा याच चौकातून आपण त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. त्यामुळे गैबी चौकात सभा घ्यावीच लागेल. 

ही बातमी वाचा: 

                           

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
Z-Morh tunnel on Srinagar-Sonamarg highway : राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 13 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सManoj Jarange  Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
Z-Morh tunnel on Srinagar-Sonamarg highway : राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
Embed widget