एक्स्प्लोर

Samarjit Ghatge : मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य

Samarjit Ghatge : भाजपचे नेते समरजित घाटगे हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी धनंजय महाडिक यांनी समरजित घाटगे यांची घेत घेतली होती.

कोल्हापूर : भाजपचे नेते समरजित घाटगे (Samarjit Ghatge) हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या (NCP Sharad Pawar Group) वाटेवर असल्याची चर्चा आहे. समरजित घाटगे हे 23 ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यातून ते मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समरजित घाटगे यांनी पक्ष सोडू नये यासाठी भाजपकडून (BJP) जोरदार हालचाली सुरु आहेत. बुधवारी भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी समरजित घाटगे यांच्या घरी त्यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर समरजित घाटगे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कागल विधानसभा मतदारसंघात (Kagal Vidhan Sabha Constituency) हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार असतील, असे जाहीर केले होते. समरजित घाटगे हे सध्या भाजपमध्ये असून ते या जागेवरुन विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळं भाजपकडून त्यांना पक्ष सोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात असून बुधवारी धनंजय महाडिक यांनी समरजित घाटगे यांची भेट घेतली.   

मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही

या भेटीनंतर समरजित घाटगे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. हसन मुश्रीफ यांची उमेदवारी घोषित करून महायुतीने एक प्रकारे संदेश दिला आहे की, माझा आणि महायुतीचा संबंध संपला.  त्यामुळे आज होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट वक्तव्य समरजित घाटगे यांनी महायुतीबद्दल केले आहे. तर मी आता खूप पुढे गेलो आहे. मागे येणं शक्य नाही, असे समरजित घाटगे यांनी बुधवारी रात्री भेटीसाठी गेलेल्या भाजपच्या शिष्टमंडळाला सांगितलं आहे. 

हसन मुश्रीफांचं टेन्शन वाढणार?

गेल्या काही दिवसांपासून समरजीत घाटगे आणि शरद पवार गटातील नेत्यांच्या वाटाघाटी सुरु होत्या. शरद पवार गटाने त्यांच्यासमोर तुतारीच्या चिन्हावर कागलमधून लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अजित पवार महायुतीत असल्याने कागलची जागा हसन मुश्रीफ यांच्या वाट्याला जाईल. त्यामुळे समरजीत घाटगे यांना संधी मिळणार नाही, हे जवळपास निश्चित होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने समरजीत घाटगे यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिल्याची चर्चा होती. सुप्रिया सुळे आणि समरजीत घाटगे यांच्यात सातत्याने बोलणी सुरु होती. स्वत: शरद पवार हेदेखील समरजीत घाटगे यांच्याशी बोलल्याची  माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. समरजीत घाटगे यांच्याकडे कायम देवेंद्र फडणवीस यांच्या गटातील नेता म्हणून पाहिले गेले आहे. त्यामुळे शरद पवारांची ही खेळी फडणवीसांसाठी मोठा धक्का असेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या हसन मुश्रीफ यांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे.

आणखी वाचा 

Samarjit Ghatge : देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादांना सांगूनच समरजित घाटगेंचा निर्णय? विधानपरिषदेची ऑफर पण मुश्रीफांच्या विरोधात लढण्यावर ठाम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! नोट बंदी निर्णयाच्या 8 वर्षानंतरही बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख अद्याप पडून; रिझर्व्ह बँकेचाही नकार 
धक्कादायक! नोट बंदी निर्णयाच्या 8 वर्षानंतरही बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख अद्याप पडून; रिझर्व्ह बँकेचाही नकार 
Baban Gite & Walmik Karad: तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार
शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gold Price Hike : सोन्याच्या दरात मोठी वाढ! सध्या जीएसटीसह सोन्याचे दर 93 हजार रुपयांवरWalmik Karad News : बीड जेलमध्ये वाल्किक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण- सुरेश धसSamruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला, उद्यापासून काय असणार दर?Kolhapur Bank News : आठ वर्षांनंतरही आठ बँकांकडे 500 आणि हजाराच्या जुन्या नोटा पडूनच, नोटा घेण्यास RBI चा नकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! नोट बंदी निर्णयाच्या 8 वर्षानंतरही बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख अद्याप पडून; रिझर्व्ह बँकेचाही नकार 
धक्कादायक! नोट बंदी निर्णयाच्या 8 वर्षानंतरही बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख अद्याप पडून; रिझर्व्ह बँकेचाही नकार 
Baban Gite & Walmik Karad: तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार
शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार
MS Dhoni : धोनी चेन्नईसाठी आता पनवती झालाय, पहिल्यांदा त्याला काढून टाका, दोन पराभवानंतर कोणी केली बोचरी टीका? युवराज सिंगच्या वडिलांची सुद्धा करून दिली आठवण!
धोनी चेन्नईसाठी आता पनवती झालाय, पहिल्यांदा त्याला काढून टाका, दोन पराभवानंतर कोणी केली बोचरी टीका? युवराज सिंगच्या वडिलांची सुद्धा करून दिली आठवण!
Jaykumar Gore:  माझं राजकारण संपलं तरी चालेल पण मी पवारांच्या पुढे झुकणार नाही; मंत्री जयकुमार गोरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
माझं राजकारण संपलं तरी चालेल पण मी पवारांच्या पुढे झुकणार नाही; मंत्री जयकुमार गोरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
वय होण्याआधीच प्रेमात पडली, आई म्हणाली अठरा वर्ष पूर्ण होताच लग्न करतो, तोपर्यंत प्रियकराचा आला नकार अन् अल्पवयीन प्रेयसीनं...
वय होण्याआधीच प्रेमात पडली, आई म्हणाली अठरा वर्ष पूर्ण होताच लग्न करतो, तोपर्यंत प्रियकराचा आला नकार अन् अल्पवयीन प्रेयसीनं...
मूलांच्या मानसिक आरोग्याकरीता संगीत कसे उपयोगी पडते!
मूलांच्या मानसिक आरोग्याकरीता संगीत कसे उपयोगी पडते!
Embed widget