Chandrakant Patil : वाचल्याशिवाय जगात काय चालले हे कळणार नाही. वाचताना फक्त नीट वाचा. प्रत्येकाला अर्थ वेगळा लागतो. वाचताना कळले नाही तर दोनवेळा वाचा. खूप वाचा. विचारपूर्वक वाचा. त्याचे मनन करून चर्चा करा. परंतु ‘ध’चा ‘मा’ करू नका, असा सल्ला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. कोल्हापुरातील दसरा चौकात (Chandrakant Patil in kolhapur) पहिल्या फिरत्या वाचनालयाचे लोकार्पण मंत्री पाटील यांच्या हस्ते फीत कापून झाले.
पाटील म्हणाले, जगातील ज्ञान हे टीव्ही, इंटरनेटवर घेणे शक्य नाही. ई-माध्यमावर वाचताना मोठा स्क्रीन असावा लागतो. तो सगळ्यांकडे उपलब्ध होईलच, असे नाही. त्यासाठी पुस्तके वाचणे गरजेचे आहे. ते म्हणाले, लोकांचे वाचन कमी झालेले नसून लोकसंख्येच्या टक्केवारीत संख्या तेवढीच आहे. फिरते वाचनालय वेगवेगळ्या परिसरात फिरणार असून त्याचे स्पॉट ठरविले जातील. वाचनालयाच्या बरोबरीने ई-लायब्ररी सुरू करण्याचा विचार आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी संस्थानकाळातील लोकांनी शिकावे यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यासाठी फिरत्या वाचनालयाचे लोकार्पण त्यांच्या पुतळ्यापासून सुरू केले आहे. त्यात जवळच्या मोठ्या गावांचा समावेश केला ठेवले जाणार आहेत. याप्रसंगी राजाराम शंकर जमकेरी यांनी एक हजार पुस्तके दिली.
ते पुढे म्हणाले, भाजप लोकांसाठी विविध उपक्रम राबवून सतत काम करतो. याचमुळे पक्षाला गुजरातमध्ये 156 जागा मिळाल्या. हे रहस्य विरोधकांनी लक्षात घ्यावे. राज्यात सध्या सुरू असलेल्या प्रकारांना उत्तर देण्यासाठी सर्व निवडणुका जिंकल्या पाहिजेत. दुसरीकडे, शाईफेक प्रकरणानंतर मंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी पहिल्यांदाच कोल्हापुरात पोहोचले. कोल्हापुरात पोहोचताच भाजपकडून पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दादांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घोषणा दिल्या. रेल्वे स्थानकावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं गेलं.
दरम्यान, फिरत्या वाचनालयात सुमारे सहा हजार पुस्तके आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तके याचबरोबर कथा, कादंबरी, अध्यात्म, इतिहास, बालसाहित्य, निसर्ग इत्यादी विषयांच्या पुस्तकांचा खजिना वाचकांना उपलब्ध होणार आहे. शहरातील विविध ठिकाणी नियोजित वेळेत गाडी थांबून वाचकांना सेवा देण्यात येणार आहे. 1 जानेवारीपासून शालेय मुलांसाठीही फिरते वाचनालय सुरू करण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या