(Source: Poll of Polls)
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: महाडिक गटाची आघाडी कायम; माजी आमदार अमल महाडिक हजार मतांनी आघाडीवर
सत्ताधारी महाडिक आघाडीने पहिल्या फेरीत 700 मतांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या फेरीतही 800 हून अधिक मतांची आघाडी घेतली आहे.विरोधी आघाडी मताधिक्य कमी करणार का? याकडेही लक्ष आहे.
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: अवघ्या कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापुरातील कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (25 एप्रिल) मतमोजणी सुरु आहे. पहिल्या दोन फेरीमध्ये सत्ताधारी महाडिक आघाडीने आघाडी घेतली आहे. सत्ताधारी महाडिक आघाडीने पहिल्या फेरीत 700 मतांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या फेरीतही 800 हून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे निकालाची उत्सुकता वाढत चालली आहे. विरोधी आघाडी मताधिक्य कमी करणार का? याकडेही लक्ष आहे.
सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार हे अमल महाडिक 1000 मतांनी आघाडीवर आहेत. सकाळी नऊ वाजून 40 मिनिटांनी प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला. सत्ताधारी आघाडीची आघाडी दुसऱ्या फेरीमध्येही कायम राहिली. उत्पादक गटातून सत्ताधारी गटाचे शिवाजी रामा पाटील (3198), सर्जेराव बाबुराव भंडारे (3173), आणि अमल महादेवराव महाडिक (3358) तर विरोधी सतेज पाटील आघाडीमधील शिवाजी ज्ञानू किबिले (2261), दिलीप गणपतराव पाटील (2328), अभिजीत सर्जेराव माने (2184) पिछाडीवर आहेत.
मतमोजणी बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सुरु आहे. दोन फेरीमध्ये 29 टेबलवर मतमोजणी होत असून पहिल्या टप्प्यामध्ये पहिले 29 आणि दुसऱ्या टप्प्यात पुढील 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणी होणार आहे. संस्था गटातील मतमोजणी दुसऱ्या फेरीत होणार आहे. संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल. संस्था गटातून सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक आघाडीवर आहेत.
राजाराम कारखान्याची मागील निवडणूक 2015 मध्ये पार पडली होती. त्यावेळी 90 टक्के मतदान झाले होते. सत्ताधारी महाडिक पॅनेलने सर्व जागा जिंकल्या होत्या. राजाराम साखर कारखान्याच्या संस्था गटातील एक आणि अन्य गटातील 20 अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत. विरोधी आमदार सतेज पाटील परिवर्तन पॅनेलचे 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने या निवडणुकीत चुरस टोकाला गेली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या