Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार, राधानगरी धरण निम्मे भरले
Kolhapur Rain : कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची सलग संततधार सुरू असल्याने तसेच धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या जोरदार पावसाने पंचगंगेची पाणीपातळी इशारा पातळकीडे वाटचाल करत आहे.
Kolhapur Rain Update : कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची सलग संततधार सुरू असल्याने तसेच धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या जोरदार पावसाने पंचगंगेची (panchganga river) पाणीपातळी इशारा पातळकीडे वाटचाल करत आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये पंचगंगेच्या पाणीपातळीत दीड फुटांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे राधानगरी धरणही (Radhanagari dam) 50 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील इतर प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीमध्येही वाढ होत असल्याने पाणी पात्राबाहेर पडत आहे. वारणा, कडवी नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील बंधारे 34 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नद्यांच्या पातळीमध्ये सातत्याने पाणी वाढत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना इशारा देण्यात आला आहे. पंचगंगेची पाणीपातळी 39 फुटांवर गेल्यास इशारा समजला जातो, तर 43 फुट धोका समजला जातो.
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन राज्य मार्ग आणि सात जिल्हा मार्ग बंद झाले असून, तेथे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. या शिवाय कागल, शिरोळ, भुदरगड येथील काही मार्ग बंद झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
बर्की धबधब्यावर पर्यटकांना बंदी (barki waterfall)
जिल्ह्यासह राज्यातील पर्यटकांचे आकर्षण असणारा शाहूवाडी तालुक्यातील बर्कीचा धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांची एकच गर्दी उसळली आहे. मात्र, स्थानिक प्रशासन तसेच महसूल विभागाकडून सुरक्षेच्या कारणास्तव जाण्यास बंदी घातली आहे. बर्कीला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील बंधारा पाण्याखाली जात असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.ग्रामस्थांनी धोक्याची कल्पना दिली असूनही अतिउत्साही पर्यटकांकडून जाण्याचे प्रकार होत असल्याने शेवटी प्रशासनाने त्या ठिकाणी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार
- Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर ज्या चंद्रकांतदादांना हिमालयात पाठवू, पाठीत खंजीर खूपसला म्हणत होते, तेच आता एकाच फलकावर झळकले!
- Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर महापालिकेची अंतिम मतदार यादी 16 जुलैला प्रसिद्ध होणार
- Rajesh Kshirsagar : शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर म्हणतात, चंद्रकांत पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे नव्हे, तर राज्याचे नेते