एक्स्प्लोर

Ambabai Mandir : अंबाबाई मंदिरातील सेवेसाठी पुष्पक हायड्रोलिक वाहन बंगळूरच्या भाविकाकडून अर्पण!

Ambabai Mandir : अंबाबाई मंदिरामध्ये प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने पुष्पक हायड्रोलिक वाहन अर्पण करण्यात आले आहे. बंगळूर येथील भाविक मेकिपत्ती राजगोपाल रेड्डी यांनी हे वाहन अर्पण केलं आहे.

Ambabai Mandir : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरामध्ये प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने पुष्पक हायड्रोलिक वाहन अर्पण करण्यात आले आहे. बंगळूर येथील भाविक मेकिपत्ती राजगोपाल रेड्डी यांनी हे वाहन अर्पण केलं आहे. अंबाबाई मंदिरामध्ये प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून वाहन घेण्याचा प्रस्ताव समितीकडून मांडण्यात आला होता. 

सदर गाडीच्या चाव्या आज समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी रेड्डी यांच्याकडून स्वीकारल्या. यावेळी व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर, के. रामराव तसेच देवस्थान समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

अंबाबाई मंदिरात राज्यातून नव्हे, तर देशभरातील भक्त दर्शनात येत असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा आकडा आता लाखाच्या घरात गेला आहे. या सदर भाविकांकडून अर्पण होणारे हार व फुले तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जमा होत असते. त्यामुळे देवीला अर्पण झालेलं साहित्य सुरक्षित बाहेर काढणे अत्यावश्यक आहे. तसेच कमी प्रमाणात मनुष्यबळाचा वापर करण्यासह लाडू प्रसाद व इतर साहित्य मंदिरामध्ये आणण्यासाठी दोन बाईक घेण्याचे समितीच्या वतीने निश्चित करण्यात आले होते.

या योजनेंतर्गत सुमारे 4 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या बॅटरीवर चालणाऱ्या दोन पुष्पक हायड्रोलिक वाहन आज अंबाबाईच्या चरणी बेंगलोर येथील भाविक मेकिपत्ती राजगोपाल रेड्डी यांनी अर्पण केल्या. त्यापैकी पहिली गाडी आज मंदिर परिसरातील लाडू वाहतूक करण्याच्या सेवेसाठी रुजू करून घेण्यात आली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Maharashtra Rain : महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Embed widget