Kolhapur News : कागल तालुक्यात आढळला बुलबुल पक्षी, निसर्गप्रेमी शिक्षकाकडून सुंदर छबी कॅमेऱ्यात कैद
कागल तालुक्यात पिंपळगाव खुर्दमध्ये निसर्गप्रेमी शिक्षक वैभव घाटगे यांनी निरंगी (अल्बिनो) बुलबुल पक्षाची नोंद केली. वैभव घाटगे नियमितरीत्या पक्षी निरीक्षण व नोंदी तसेच छायाचित्रण करत असतात.
Kolhapur News : कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्दमध्ये निसर्गप्रेमी शिक्षक वैभव घाटगे यांनी निरंगी (अल्बिनो) बुलबुल पक्षाची नोंद केली आहे. या पक्षाला त्यांनी कॅमेऱ्यामध्ये केले. वैभव घाटगे नियमितरीत्या पक्षी निरीक्षण व नोंदी तसेच छायाचित्रण करत असतात.
28 जुलै रोजी पिंपळगाव मार्गावर हा अल्बिनो बुलबुल दिसून आला. अल्बिनो निरंगीपणा हा मेलानिनच्या कमतरतेमुळे येतो. निरीक्षणामध्ये त्यांना हा बुलबुल एकटा सूर्य स्नान घेताना दिसून आला, तर नंतर आहारासाठी विविध झाडावर त्याची मार्गक्रमणा दिसून आली. टणटणीची पक्व फळे मोठ्या प्रमाणात खाताना दिसून आला. अशा बुलबुलची खात्रीशीर नोंद श्रीलंकेमध्ये झाली आहे.
लाल बुडाचा बुलबुल (pscnonotus cafer सायनोट्स कॅफर) या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. मानवी वस्ती नजीक मोठ्या प्रमाणात दिसून येतो. टणटणीच्या प्रसारात याचा वाटा मोठ्या प्रमाणात असतो थोडासा दीड स्वभावाचा हा पक्षी मानवी वस्ती देखील नियमित घरटे करतो. याची उंची 20 सेमी असून सामान्य बुलबुलाचे डोके काळसर असते व बुडाला लाल रंग असतो. कावळा चिमणी महिना या पक्षांबरोबरच मानवी वस्ती नजीक दिसणारा बुलबुल देखील सहजपणे दृष्टीस पडतो विहिरीच्या हंगामात निर्माती एकत्र दिसून येतात.
बुलबुल बेरी वर्गीय फळे सुरवंट किडे खातो सह्याद्रीमध्ये बुलबुल डिसेंबर ते मे महिन्यात घरटे करतात. मादी 2-3 अंडी घालते. अंड्याचा आकार 21 मी.मी. असतो. बारा दिवसानंतर पिले अंड्यातून बाहेर पडतात. घराजवळ घरटे करत असल्याने याच्या पारिवारिक जीवनाचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करता येतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur Nagarpalika election 2022 : ओबीसी आरक्षणाशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुका होणार
- Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर
- Kolhapur ZP Election 2022 : कोल्हापूर झेडपीसाठी आरक्षण सोडत जाहीर, अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले!