एक्स्प्लोर

Ichalkaranji Vidhan Sabha : इचलकरंजीतून राहुल आवाडेच उमेदवार! महायुतीला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार प्रकाश आवाडेंची मोठी घोषणा

Ichalkaranji Vidhan Sabha : कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारसंघांमध्ये कोणतीही संभ्रमावस्था राहू नये यासाठी मी हा निर्णय घेतला असल्याचे प्रकाश आवडे यांनी आपला निर्णय जाहीर करताना सांगितले.

कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची महायुतीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आता अवघ्या चार दिवसांमध्येच इचलकरंजीमधून सुद्धा विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या मुलाची उमेदवारी जाहीर केली आहे. राहुल आवाडे हेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असतील, अशी घोषणा आज प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे महायुतीला पाठिंबा दिलेला असतानाही प्रकाश आवाडे यांनी घेतलेल्या निर्णयाने भूवया उंचावल्या आहेत.

आम्ही कोणाकडे उमेदवारी मागायला जाणार नाही

दरम्यान, महायुतीने पाठिंबा दिल्यानंतर काय निर्णय घेणार याबाबत विचारले असता त्यांनी या संदर्भातील निर्णय त्यावेळी पाहू असे सांगितले. आम्ही कोणाकडे उमेदवारी मागायला जाणार नाही. ते ताराराणी पक्षाकडून ती उभे राहतील असे त्यांनी सांगितले. आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीमधून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर करताना अजून तीन ते चार ठिकाणी उमेदवार देणार असल्याची घोषणा केली. हे सर्व उमेदवार ताराराणीच्या चिन्हावर उभा करणार असल्याचेही आवाडे यांनी म्हटलं आहे. 

राहुल आवाडे हेच इचलकरंजीमधून उमेदवार असतील

पक्ष कोणता असेल याची चर्चा करण्यापेक्षा राहुल आवाडे हेच इचलकरंजीमधून उमेदवार असतील. कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारसंघांमध्ये कोणतीही संभ्रमावस्था राहू नये यासाठी मी हा निर्णय घेतला असल्याचे प्रकाश आवडे यांनी आपला निर्णय जाहीर करताना सांगितले.

ते म्हणाले की, मागील वेळी सुद्धा मी स्वतःच लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही प्रामाणिकपणे भाजपचे पाठीशी उभा असल्याचं प्रकाश आवाडे यांनी नमूद केले. माझ्या निर्णयाबाबत वरिष्ठांना माहिती दिली असल्याचेही प्रकाश आवाडे यांनी सांगितलं. उमेदवारी संदर्भात कोणताही वेळ घालवायला नको. कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. राहुल आवाडे यांचं काम घरोघरी पोहोचवण्याचं काम सुरू असून कोणत्याही प्रकारे संभ्रमावस्था नको म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे प्रकाश आवाडे म्हणाले. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित झाल्याचे चित्र आहे. आवाडे यांनी इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळमधून उमेदवार देण्याचे सुतोवाच केले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
D Y Patil passes away: मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Embed widget