एक्स्प्लोर

Kolhapur Ganesh 2022 : घरबसल्या घेता येणार कोल्हापूर गणेशोत्सवाचे ऑनलाईन दर्शन!

कोल्हापूर गणेशोत्सव 2022 चे ऑनलाईन दर्शन घरबसल्या घेता येणार आहे. ईझी कोल्हापूर या अॅपच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध असेल. कोल्हापूर शहरातील गणेश मंडळांना आपली माहिती अॅपवर प्रसिद्ध करता येणार आहे.

Kolhapur Ganesh 2022 : कोल्हापूर महापालिका व सेवा इन्फोटेक यांच्याकडून आजपासून कोल्हापूर गणेशोत्सव 2022 चे ऑनलाईन दर्शन घरबसल्या घेता येणार आहे. ईझी कोल्हापूर या अॅपच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध असेल. कोल्हापूर शहरातील गणेश मंडळांना आपली माहिती अॅपवर प्रसिद्ध करता येणार आहे. किंवा www.ezykolhapur. com या संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती अपलोड करायची आहे.

2019 पासून ईझी कोल्हापूर ॲपच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या कोल्हापूरमधील गणेशोत्सव घरबसल्या पाहता येत आहे. सहभागी सार्वजनिक गणेश मंडळे, तसेच घरगुती आरास, देखाव्यांचे फोटो, व्हिडिओ,  कोल्हापूर शहरातील तालमींचा इतिहास, तसेच मंडळांची वैशिष्ट्ये, कोल्हापूरकरांचे अभिप्राय अशी माहिती उपलब्ध केली आहे. 

कोल्हापूर शहरातील पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळांसाठी पुरस्कार

दरम्यान, राज्य सरकारने राबवलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेच्या धर्तीवर कोल्हापूर शहरातील मंडळांसाठी गणेशोत्सव मंडळ स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिकेकडून घेण्यात येणार आहे.  शहरातील मंडळ शासन स्तरावर व महापालिका दोन्ही ठिकाणी नोंदणी करून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. दरम्यान, राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे स्पर्धेचे स्वरूप व निकष ठरवण्यात आले आहेत.

कोणत्या मंडळाला सहभागी होता येईल?

स्थानिक पोलीस ठाणे आणि मनपाची परवानगी घेतलेल्या मंडळांना सहभागी घेता येईल. या स्पर्धेतील सहभाग मोफत आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.kolhapurcorporation.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तो अर्ज भरून healthswm1@gmail.com या मेलवर शनिवारी 3 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पाठवता येईल.  अथवा महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील मुख्य आरोग्य निरीक्षक कार्यालयात जमा करता येईल.

या स्पर्धेमधून तीन स्पर्धकांची विजेते म्हणून निवड होणार आहे. मुल्यांकन करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. प्रशस्तीपत्र आणि चषक असे पुरस्काराचे स्वरुप आहे.  निकालाची तारीख व बक्षीस वितरण समारंभ नंतर मनपा प्रशासनाकडून कळवण्यात येणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Osho : ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सParbhani Rada : परभणीत महिला आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोडMaharashtra Superfast News :  11 December 2024  : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaRamdas Athawale : आरोपीवर कठोर कारवाई व्हावी - रामदास आठवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Osho : ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Mukhyamantri Sahayata Nidhi: मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
Embed widget