Kolhapur Crime : निवडणुकीच्या तोंडावर परप्रांतीय आरोपीकडून तब्बल 23 धारदार तलवारी जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Kolhapur Crime : कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करताना परप्रांतीय आरोपीकडून तब्बल 23 तलवार आणि मोटारसायकल असा 36 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
Kolhapur Crime : कोल्हापूर मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु असतानाच कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करताना परप्रांतीय आरोपीकडून तब्बल 23 तलवार आणि मोटारसायकल असा 36 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या बेकायदेशीर हत्यारांची तस्करीची पाळेमुळे खोदून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस अंमलदार कुमार पोतदार यांना नामे विजयसिंग तुफानसिंग कलाणी (रा. आसरानगर, निपाणी) याचेकडे धारदार तलवारी घेऊन विक्रीसाठी कागल येथील आय.बी.पी. पेट्रोल पंपाचे शेजारी असलेल्या दुधगंगा पी.यु.सी. सेंटर जवळ येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस अमंलदार खंडेराव कोळी, चंदू नववरे, कुमार पोतदार व प्रदीप पोवार यांचे पथकाने सापळा रचून नामे विजयसिंगला ताब्यात घेत 23 धारदार तलवारी व एक मोटर सायकल असा 36 हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह पकडले.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, पोलीस अंमलदार खंडेराव कोळी, चंदू नववरे, कुमार पोतदार, प्रदीप पोवार, संजय पडवळ व संतोष पाटील यांनी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur News : उद्धव ठाकरेंनी नाव घेताच कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी राज्यपालांना कोल्हापुरी चप्पल दाखवले!
- Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांनी कामाची यादी वाचत गोकुळ, केडीसीचा विषय काढला, सतेज पाटलांना थेट पाईपलाईन कामावरून टोला!
- Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांनी कामाची यादी वाचत गोकुळ, केडीसीचा विषय काढला, सतेज पाटलांना थेट पाईपलाईन कामावरून टोला!