Sharad Pawar Speech Highlights : शेतकऱ्यांचा अपमान ते मणिपूमधील महिलांवरील अत्याचार; शरद पवार यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Sharad Pawar Speech Highlights : कोल्हापूर येथील स्वाभिमान सभेत बोलताना शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना पक्षातील बंडखोर नेते आमदार हसन मुश्रीफ यांनाही फटकारले.
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज कोल्हापूरमध्ये स्वाभिमान सभेला संबोधित केले. आपल्या भाषणात शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना पक्षातील बंडखोर नेते आमदार हसन मुश्रीफ यांनाही फटकारले. तरुण, शेतकरी, महिला, सगळ्याच घटकांना अडचणीत टाकणाऱ्या मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला धडा शिकवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शरद पवार यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :
- ही शाहू महाराजांची नगरी आहे. देशाला दिशा दाखवणारी नगरी आहे. मिळालेली सत्ता ही सामान्यांसाठी वापरायची असते हे शाहू महाराजांनी दाखवून दिले.
- इस्रोची स्थापना करण्यात नेहरूंचा वाटा आहे. इंदिरा गांधी असो किंवा वाजपेयी असो किंवा अब्दुल कलाम असो वा मोदी असो या सगळ्यांनी इस्रोला बळ देण्याचे काम केले.
- चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यास मानवाचे कल्याण होईल... ही एका बाजूला स्थिती आहे... तर दुसरीकडे लोक महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहेत..
- नव्या पिढीमध्ये बेकारीचे संकट दिसून येत आहे.... घाम गाळण्याची तयारी आहे...तरुण नोकरी मागत आहेत...
- शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत...शेतमालाला किंमत नाही आणि बँकांचा कर्ज वसुलीसाठी तगादा....
- कांद्यांवर कर लावल्याने शेतकरी अडचणीत...मी कृषीमंत्री असताना कांद्यावर कर लावला नाही...
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाला दाम हवाय... पण सरकारने कर बसवला....
- कोल्हापूर जिल्हा हा ऊसाचा पिक घेणारा महत्त्वाचा जिल्हा आहे...आता सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे...साखरेला किंमत मिळणार नाही... कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना याचा फटका बसणार....
- दिल्लीच्या सीमेवर 12 महिने शेतकरी बसले होते. मात्र, या 12 महिन्यात मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. शेतकऱ्यांचा एवढा मोठा अपमान आतापर्यंतच्या कोणत्याच सरकारने केला नाही
- मणिपूरमध्ये दोन समाजात संघर्ष सुरू आहे... आई-बहिणींची धिंड काढली जाते.. ज्या सरकारला महिलांची अब्रू वाचवता येत नाही, त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही
- सत्तेचा वापर हा विरोधकांना नामोहराम करण्यासाठी सुरू आहे. कोल्हापूरमध्ये एका नेत्याच्या घरी ईडी, आयकर विभागाने धाडी मारल्या. त्या घरातील भगिनींनी आम्हाला हवं तर गोळ्या मारा पण असा छळ नको असे बोलण्याचे धाडस दाखवले. मात्र, त्या घरच्या नेत्यांना हे धाडस दाखवता आलं नाही.
- अनिल देशमुख स्वच्छ भूमिका घेत होते. त्यांनी तडजोड करणार नसल्याची भूमिका घेतली. पण केवळ त्रास देण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्याला तुरुंगात टाकले.
- सामनाचे संपादक संजय राऊत हे भाजपवर टीका करत असतात. त्यांनाही लिखाण बंद करण्याची धमकी दिली. त्यांनी जुमानल नाही तर त्यांनाही तुरुंगात टाकलं. नवाब मलिक यांना देखील तुरुंगात टाकलं.
- सत्तेचा गैरवापर कुणी केला, तरुणांना कुणी बिघडवल? हे सगळं आपण बदलू. मोदींच्या हातातून सत्ता काढून घेऊन तरुणांच्या हाती देण्याची गरज आहे. आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्याची संधी