Bidri Sakhar Karkhana : ज्या बिद्री कारखान्यात माझ्या बाबानं काम केलंय, तिथं माझ्या हातून पाप होणार नाही; प्रकाश आबिटकरांची भावनिक साद
Bidri Sakhar Karkhana : कारखान्यात सत्तांतर करण्यासाठी शड्डू ठोकलेल्या शिंदे गटाच्या आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी कारखान्याच्या सभासदांना भावनिक साद घातली.
![Bidri Sakhar Karkhana : ज्या बिद्री कारखान्यात माझ्या बाबानं काम केलंय, तिथं माझ्या हातून पाप होणार नाही; प्रकाश आबिटकरांची भावनिक साद My father works in idri factory so there will be no sin on my hands prakash abitkar emotionally request to member hasan mushrif satej patil k p patil Bidri Sakhar Karkhana : ज्या बिद्री कारखान्यात माझ्या बाबानं काम केलंय, तिथं माझ्या हातून पाप होणार नाही; प्रकाश आबिटकरांची भावनिक साद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/25/c99cc1d7363ce0350285515ba48b0ab71700913137550736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जात असलेल्या बिद्री साखर कारखान्याच्या (Bidri Sakhar Karkhana) निवडणुकीत चुरस शिगेला पोहोचली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) पुढाऱ्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करत शड्डू ठोकला आहे. कारखान्यात सत्तांतर करण्यासाठी शड्डू ठोकलेल्या शिंदे गटाच्या आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी कारखान्याच्या सभासदांना भावनिक साद घातली. कारखान्यामधील प्रकल्पांना विरोध केल्याचा आरोपांना सुद्धा खोडून काढले.
कारखाना अडचणीत येईल असं कोणतंही पाप माझ्या हातून होणार नाही
प्रकाश आबिटकर यांनी प्रचारसभेत बोलताना आपले वडिल या कारखान्याचे कामगार होते याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, माझे वडील या ठिकाणी बसले आहेत. मी बिद्री साखर कारखान्याच्या कामगाराचा मुलगा आहे. बिद्री कारखान्यावर अनेकांची कुटुंब चालली आहेत. त्याच एका घरामधील मी सुद्धा एक आहे. त्यामुळे बिद्री कारखाना अडचणीत येईल असं कोणतंही पाप माझ्या हातून होणार नाही.
बिद्रीत परिवर्तन अटळ
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर सभासदांना म्हणायचे तुम्हीच कारखान्याचे मालक आणि निवडून आल्यानंतर मीच एकटा कारखान्याचा मालक अशी विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यांची नीती आहे. त्यांची फसवेगिरीची नीती सर्वांना कळाली आहे. त्यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून अनेक संचालक परिवर्तन आघाडीत सहभागी झाल्याने बिद्री कारखान्यात परिवर्तन अटळ असल्याचे प्रतिपादन हुतात्मा स्वामी सूतगिरणीचे विद्यमान संचालक निवासराव देसाई यांनी केले.
राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी सहकार्य करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी स्वागत केले. आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, लय भारीची टीमकी वाजवणाऱ्या के. पी. पाटील यांनी सभासदांसाठी कोणत्या कल्याणकारी योजना राबवल्या ते सांगावे, ऊस तोडणी कार्यक्रमांचा अनेकवेळा फज्जा उडाला. यामुळे शेतकरी बांधवांचा ऊस वाळल्याने कार्यक्षेत्रातील अनेक सेंटर ऑफिसला टाळे ठोकण्याची वेळ सभासदांवर आल्याची टीका त्यांनी प्रचारसभेत केली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)