एक्स्प्लोर

Kolhapur News: दोन पाटलांचा गप्पांचा फड रंगला तेव्हा धनंजय महाडिकांची एन्ट्री; पीएन पाटलांना राजकीय टोला! शाहू समाधी स्थळावर काय घडलं?

राजाराम कारखान्यापासून महाडिक आणि सतेज पाटील गट यांच्यामध्ये संघर्ष टोकाला गेला आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते शाहू समाधीस्थळावर कार्यक्रमाच्या निमित्ताने आमने-सामने आल्यानंतर बोलणार का? याची चर्चा रंगली होती.

Kolhapur News: कोल्हापूरचे भाग्यविधाते, समतेचा पाया रचणारे, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांना कोल्हापुरात शनिवारी सहा मे रोजी स्मृतिदिनी 100 सेकंद स्तब्ध राहून अभिवादन करण्यात आले. शाहू समाधीस्थळावर मानवंदना देण्यासाठी कोल्हापुरातील राजकीय मांदियाळी जमली होती. यावेळी सर्वांच्याच नजरा खासकरून दोन नेत्यांकडे लागून राहिल्या होत्या. माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे आमने-सामने आल्यानंतर बोलणार का? याचीच चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. मात्र, जेव्हा उभय नेते आमने-सामने आले तेव्हा त्यांची साधी नजरेला नजरही झाली नाही. 

दोन पाटलांमध्ये बराच काळ गप्पांचा फड

राजाराम कारखान्यापासून महाडिक आणि सतेज पाटील गट यांच्यामध्ये संघर्ष टोकाला गेला आहे. या संघर्षाने टोक गाठले असून त्याचे पडसाद बिंदू चौकापर्यंत उमटले. त्यामुळे हे दोन्ही नेते शाहू समाधीस्थळावर कार्यक्रमाच्या निमित्ताने आमने-सामने आल्यानंतर बोलणार का? याची चर्चा रंगली होती. मात्र, दोघांनीही एकमेकांकडे बघणंसुद्धा टाळले. आमदार सतेज पाटील यांचे स्मृतीस्थळावर आगमन झाल्यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री चंद्रकांत पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह उपस्थित असलेल्यांशी संवाद साधला. संवाद साधून झाल्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या बाजूला जाऊन सतेज पाटील बसले. यानंतर दोन पाटलांमध्ये बराच काळ गप्पांचा फड रंगला. इतर उपस्थितांचे चांगलेच लक्ष या गप्पांच्या फडाकडे लागून राहिले होते. 

राजकीय वजन तेवढे कमी होऊ देऊ नका 

ही चर्चा सुरू असतानाच धनंजय महाडिक यांचे आगमन झाले. त्यांनीही उपस्थितांशी हस्तांदोलन करून आमदार पी. एन. पाटील यांच्या शेजारी जाऊन बसले. मात्र, त्यांनी सतेज पाटील यांच्याकडे पाहिले नाही. खासदार महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्यामध्येही बराच काळ चर्चा सुरु होती. ही चर्चा सुरु असतानाच पी. एन. पाटील यांच्या दिशेने चंद्रकांत पाटील आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पी. एन. पाटील यांना हळूच चिमटा काढला. ते म्हणाले पी. एन. पाटील शारीरिक वजन कमी झालं असलं तरी राजकीय वजन तेवढे कमी होऊ देऊ नका. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case Update : CID ने Vishnu Chate च्या कस्टडीसाठी केला कोर्टाकडे अर्जVasai Jewellery Shop Robbery : वसईच्या मयंक ज्वेलर्सवर दरोडा, चोरट्यांनी 50 तोळं सानं लुटलंMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 7.30 AM | 11 Jan 2025 | ABP MajhaPrataprao Jadhav On Buldhana Hair Fall : केस गळतीच्या संख्येत वाढ, आरोग्य पथ बोंडगावात दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Torres Scam : 300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील अनेक गोष्टी समोर, आरोपीच्या घरातून 77 लाख जप्त
300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक गोष्टी, आरोपीच्या घरात 77 लाख सापडले
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
Embed widget