Darshana Jardosh in Kolhapur : डबल इंजिन सरकार असलेल्या राज्यांची अवस्था पहा ! रेल्वे राज्यमंत्र्यांची ठाकरे सरकारवर टीका
रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोष कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी राज्यात सुरु असलेल्या बुलेट ट्रेन कामाच्या गतीवरूनही ठाकरे सरकावर हल्ला चढवला.
Darshana Jardosh in Kolhapur : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोष यांनी ठाकरे सरकारचा उल्लेख डबल इंजिन सरकार असा करत ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. त्यांनी वाढत्या महागाईवरुनही ठाकरे सरकारला लक्ष्य केले.
रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोष कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी राज्यात सुरु असलेल्या बुलेट ट्रेन कामाच्या गतीवरूनही ठाकरे सरकावर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, डबल इंजिन सरकार ज्या राज्यांमध्ये आहेत त्याठिकाणी योजनांची काय अवस्था झाली आहे हे तपासून पहावे.
केंद्र सरकारच्या सर्व योजना व्यवस्थितरित्या सुरु आहेत. जे प्रकल्प हाती घेतले आहेत ते पूर्णत्वास नेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना राज्याचे प्रश्न चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. ज्या कामाचा शुभारंभ आम्ही करतो त्या कामाचे उद्घाटन देखील आम्हीच करतो. भाजप विकासकामात राजकारण करत नसल्याचे सांगत दर्शना जरदोष यांनी बिगर भाजपशासित राज्यांवर टिकास्त्र सोडले.
Had a pleasant time interacting with the beneficiaries of 'PM Kisan Samman Nidhi' at Chhatrapati Shahu Sahakari Sakhar Karkhana Ltd.,Kagal in Kolhapur.
— Darshana Jardosh (@DarshanaJardosh) June 15, 2022
A total of ₹ 103 crores have been disbursed to 51,785 beneficiaries in Kagal Taluka.#8YearsOfSeva
(1/2) pic.twitter.com/V1dS1FPpvm
राज्यात बुलेट ट्रेनचे काम संथगतीने
रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोष यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पावरूनही ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. त्यांनी यासाठी गुजरातचे उदाहरण दिले. त्या ठाकरे सरकारवर टीका करताना म्हणाल्या की, गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, पण नवसारी स्टेशननंतर काम अगदी धीम्या गतीने सुरू आहे. जरदोष यांनी एकप्रकारे राज्यामध्ये बुलेट ट्रेनचे काम संथ सुरु असल्याची टीका केली आहे.
Kolhapur Dist. BJP President and Chairman Shahu Udhyog Group Shri @ghatge_raje ji, Kolhapur BJP Kisan Morcha President Shri Bhagwan Kate ji and General Secretary BJP, Kolhapur Shri Vitthal Patil ji also joined me during this visit.
— Darshana Jardosh (@DarshanaJardosh) June 15, 2022
(2/2)#8YearsOfSeva pic.twitter.com/XE3LB9j2VE
राजश्री छत्रपति शाहू महाराज यांना मानाचा मुजरा!
— Darshana Jardosh (@DarshanaJardosh) June 15, 2022
मेरा सौभाग्य है कि कोल्हापुर की पावन धरती में मेरी प्रथम यात्रा लोकराजा छत्रपति शाहू महाराज' की 100वीं पुण्यतिथि के दौरान हुई। उनके समाधि स्थल की माटी में आज भी शाहू महाराज की समतामूलक विचारधारा एवं तेज ऊर्जा की अनुभूति होती है। pic.twitter.com/m8LUNKbj8t