एक्स्प्लोर

Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी

गोकुळच्या विकासाची जबाबदारी मी तसेच आमच्या समविचारी आघाडीचे उमेदवार निश्चितपणे पार पाडू, गोकुळ टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कटिबध्द राहूया, असे आवाहन सतेज पाटील यांनी केलं आहे. 

Satej Patil on Gokul: गोकुळच्या प्रगतीमध्ये दूध उत्पादक शेतकरी आणि माता-भगिनींचा मोठा वाटा आहे. शेतकरी आणि माता-भगिनी पहाटेपासून घाम गाळून, शेणा-मुतात हात घालून केलेल्या कष्टामुळेच गोकुळ नावारुपाला आला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे खरे बाप असल्याचे गोकुळ सत्ताधारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी ठणकावलं आहे.  गोकुळचे शिल्पकार कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांनी गोकुळ दूध संघाला प्रगतीपथावर नेले. गोकुळने जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर 10 दिवसाला 80 कोटी रुपयाचे दुधाचे बिल देवून खऱ्या अर्थाने अर्थक्रांती घडवून आणली असल्याचे त्यांनी सांगितले. 

वक्तव्य केल्यानंतर संतापाचा उद्रेक

माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी विश्वास पाटील गोकुळचे बाप असल्याचे वक्तव्य केल्यानंतर संतापाचा उद्रेक झाला आहे. दुसरीकडे, सोशल मीडियात शेतकऱ्यांच्या पोरांनी हिसका दाखवल्यानंतर अरुण डोंगळे यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटलं आहे. सतेज पाटील म्हणाले की, दूध उत्पादकांचा सन्मान, दुधाला जास्तीत-जास्त दर मिळवून देणे, गोकुळ दूध संघ टिकविणे हाच माझा प्रयत्न आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये गट-तट तसेच पक्ष बाजूला ठेवून आपण राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीला सहकार्य आणि आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती मी आपणांस करत आहे. गोकुळच्या विकासाची जबाबदारी मी तसेच आमच्या समविचारी आघाडीचे उमेदवार निश्चितपणे पार पाडू, अशी ग्वाही या निमित्ताने देतो. तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून गोकुळ टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कटिबध्द राहूया, असे आवाहन त्यांनी केलं आहे. 

दरवाढ देवून शब्द पाळला

सतेज पाटील म्हणाले की, गोकुळच्या गेल्या निवडणुकीमध्ये दुधाला 2 रुपये जादा दर देण्याचा शब्द मी दिला होता. या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षात म्हैशीच्या दुधाला 14 रुपये आणि गायीच्या दुधाला 10 रुपये प्रति लिटर दरवाढ देवून हा शब्द पाळला आहे. त्याबरोबरच गोकुळ दूध संघ, संघाशी संलग्न दूध संस्था, दूध उत्पादक शेतकरी यांच्या हिताचा कारभार माझ्या नेतृत्वाखाली झाल्याचे समाधान असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 

'विश्वास आबा हेच गोकुळचे बाप' 

दरम्यान, अरुण डोंगळे यांनी 'विश्वास आबा हेच गोकुळचे बाप' असं म्हणून शेतकऱ्यांचा राग ओढवून घेतला होता. सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या पोरांनी या दोन्ही नेत्यांची धुलाई केली होती. अखेर विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांनी 'यू-टर्न' घेत आपल्याच वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा कांगावा केला. दूध उत्पादक शेतकरीच गोकुळचा खरा मालक आहे, हे मान्य करावं लागलं. गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी विश्वास पाटील यांना गोकुळचे बाप घोषित केलं होतं. सोशल मीडियावर तर तरुणांनी अशी काय राळ उडवून दिली की नेत्यांना अडचण झाली होती. सोशल राडा बघून विश्वास पाटील यांनी लगेच डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली. डोंगळे यांनी फक्त ज्येष्ठत्वाच्या नात्याने ते बोलले, असं सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या चरणावर लोटांगण घातलं आणि शेतकरीच मालक असल्याचं कबूल केलं. इकडे अरुण डोंगळे यांनी सुद्धा 'माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला हो' असं म्हणत सुटका करून घेतली.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget