(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Temperature In Kolhapur : कोल्हापुरात पावसाचा ब्रेक, पण गेल्या तीन दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढल्या
Tmperature In Kolhapur : गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने कोल्हापूर शहरातील कमाल तापमानात वाढ होत आहे. मंगळवारी दिवसभर कोल्हापूर शहरात वातावरण उष्ण व दमट राहिले.
Tmperature In Kolhapur : गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने कोल्हापूर शहरातील कमाल तापमानात वाढ होत आहे. मंगळवारी दिवसभर कोल्हापूर शहरात वातावरण उष्ण व दमट राहिले. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी कोल्हापुरातील कमाल तापमानात २ अंशांनी वाढ होऊन 29.1 अंश सेल्सिअसवर पोहोचले. किमान तापमान 20.3 अंश सेल्सिअस स्थिर होते.
सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही गेल्या काही दिवसांपासून कमी पाऊस झाल्याने कमाल तापमानात अचानक वाढ होत आहे. मंगळवारी सांगलीत कमाल तापमान 29.2 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20.2 अंश सेल्सिअस होते. साताऱ्यात कमाल तापमान 4 अंशांनी घसरून 25.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21.0 अंश सेल्सिअसवर पोहोचले. सोलापुरात कमाल तापमान 26.3 अंश सेल्सिअस तर किमान 22.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले.
कोल्हापूर जिल्ह्यातील तीन बंधारे पाण्याखाली
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही तीन बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीवरील रुई व इचलकरंजी आणि दुधगंगा नदीवरील दत्तवाड असे तीन बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत.
#कोल्हापूर#राधानगरी धरणात 227.01 दलघमी पाणीसाठा असून धरणातून 800 क्युसेक्स विसर्ग सुरु आहे.#पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी#दुधगंगा नदीवरील- दत्तवाड बंधारे पाण्याखाली आहेत.@MahaDGIPR @drsskharat
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur) September 21, 2022
राधानगरी धरण सध्या 98 टक्के भरले असून सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. धरणाच्या पॉवर हाऊसच्या गेटमधून केवळ 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या 24 तासांत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 0.8 मिमी पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली.
कोल्हापूरमध्ये गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे
- हातकणंगले-0.5
- शिरोळ -0.6
- पन्हाळा-0.0
- शाहूवाडी-0.1
- राधानगरी-0.1
- गगनबावडा-0.8
- करवीर- 0.1
- कागल- 0.1
- गडहिंग्लज-0.2
- भुदरगड- 0.1
- आजरा-0.2
- चंदगड-0.0
#कोल्हापूर #राधानगरी धरणात 227.01 दलघमी पाणीसाठा असून धरणातून 800 क्युसेक्स विसर्ग सुरु.
— DISTRICT INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@Info_Kolhapur) September 21, 2022
पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी
दुधगंगा नदीवरील- दत्तवाड असे एकूण 3 बंधारे पाण्याखाली आहेत.@MahaDGIPR @InfoDivKolhapur
इतर महत्वाच्या बातम्या