एक्स्प्लोर

Lumpy Skin Disease : लम्पी चर्मरोगाचा वेगाने फैलाव सुरुच, कोल्हापूर, सांगली, सातारमध्ये 27 जनावरांचा बळी

lumpy skin disease : जनावरांमधील लम्पी चर्मरोगाने महाराष्ट्रात भयावह रुप धारण केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये 27 जनावरे या रोगाला बळी पडली आहेत.

lumpy skin disease : जनावरांमधील लम्पी चर्मरोगाने महाराष्ट्रात भयावह रुप धारण केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये 27 जनावरे या रोगाला बळी पडली आहेत. मोठ्या प्रमाणात पशुधनामध्ये आजार फैलावत चालल्याने पशुधन उत्पादक मुळापासून हादरला आहे. लसीकरणाने वेग घेतला असला, तरी साथ अजून आटोक्यात आलेली नाही.   

सातारा जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाने कहर केला असून आतापर्यंत 15 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 321 जनावरांना लागण झाली असून आजघडीला 242 अॅक्टीव्ह केसेस आहेत. सातारनंतर कोल्हापूरमधील परिस्थिती बिकट असून 9 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 108 जनवरांना लागण झाली असून 76 पशुधनावर उपचार सुरु आहेत. सांगलीमध्ये 105 जनावरे बाधित झाली असून तीन मृत्यू झाले आहेत. 

तीन जिल्ह्यातील प्रशासनाकडून सर्व गायींचे प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्थानिक प्रशासनाला नोंदणीकृत नसलेल्या भटक्या गायींचे लसीकरण करण्यास सांगितले आहे. 

राहुल रेखावार या निर्णयाबाबत माहिती देताना म्हणाले, आम्ही भटक्या गायींचे लसीकरण सुरु केलं आहे. शनिवारपर्यंत कोल्हापूर शहरातील भटक्या गायींचे लसीकरण करण्याचे नियोजन मनपाकडून करण्यात आले आहे. पशुधन मालकांनी स्वत: पुढे येत लसीकरण करून घेतले पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यात 2.8 लाख नोंदणीकृत गायी असून त्यापेक्षा डबल लसीचे डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे लागण होण्यापूर्वीच लसीकरण तत्काळ करून घेतले पाहिजे. 

कोल्हापूर जिल्ह्यात दीड लाख गायींचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. खासगी संस्थांकडूनही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक 8.3 लाख गायी आहेत.  राहुल रेखावार पुढे म्हणाले, गाय पशुधन मालकांनी सर्वाधिक काळजी घेणं आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांची वाहतूक होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जनावरांचा गोठा  स्वच्छ असायला हवा.  

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
Gokul Election: 'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
Meenakshi Shinde मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
Pune Accident News: वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Virar Crime News: बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
Embed widget