एक्स्प्लोर

Mahadev Jankar : ...तर आम्हीसुद्धा स्वतंत्र निवडणूक लढण्यास तयार, लोकसभेच्या 48 जागा लढवू; महादेव जानकरांचा भाजपला इशारा

भाजपला जर आमची गरज वाटत असेल तर त्यांनी सोबत घ्यावं अथवा आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही, आम्हीही आमची ताकद दाखवून देऊ असं महादेव जानकर म्हणाले.

Mahadev Jankar : भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरून ठिणगी पडली असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनीसुद्धा युतीला इशारा दिला आहे. आम्हाला घेतल्याशिवाय जर शिवसेना भाजपने जागावाटप केलं असेल तर आम्हीसुद्धा स्वतंत्र लढण्यास तयार आहोत. लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 ही जागा आम्ही लढवू असा इशारा महादेव जानकर यांनी दिला आहे. ते पालघरमध्ये बोलत होते. भाजपला जर आमची गरज वाटत असेल तर त्यांनी सोबत घ्यावं अथवा आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही. आम्हीही आमची ताकद दाखवून देऊ असंही जानकर म्हणाले. तसंच येत्या विधानसभेसाठी आपणही काही जागांची मागणी केली असून, त्यावर भाजप काय निर्णय घेते हे येत्या काळात स्पष्ट होईल असंही जानकर यांनी सांगितलं.

नुकसानीचे पंचनामे करा, शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा

राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हे जरी नैसर्गिक संकट असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं लक्ष घालून या नुकसानीचे पंचनामे केले पाहिजेत. शेतकऱ्याला मदत लगेच दिली पाहिजे असे महादेव जानकर म्हणाले.

पंकजा मुंडे माझी बहीण, मात्र आमचा पक्ष वेगळा

पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे. मला गोपीनाथ मुंडे यांनी मानसपुत्र मानले आहे. पंकजा या भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय त्या घेतील माझा पक्ष वेगळा आहे. त्याच्यामुळे माझा निर्णय मला घ्यावा लागेल असेही महादेव जानकर यावेळी म्हणाले.

बावनकुळेंच्या वक्तव्याने वादाची ठिणगी!

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त 48 जागा देण्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळातील भुवया उंचावल्या. बावनकुळे यांनी थेट केलेल्या वक्तव्यानंतर वाद होणार असे दिसताच त्यांचा व्हिडीओ डिलीट करण्यात आला. यानंतर बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे बावनकुळे यांच्या वक्तव्यावर भाजपने सारवासारव केली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण देत खुलासा केला आहे. शिवसेना शिंदे गटाकडूनही कृषीमंत्री दादा भुसे यांनीही अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. 48 ते 50 जागांपुरतीच शिवसेनेची ताकद नसून विचारविनिमय करुन निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आता भाजपकडून सारवासारव केली जात आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील 2024 च्या विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. माझ्या कानावर असं काही आलेलं नाही. बावनकुळे काय बोलले मला माहित नाही. जागा वाटप संदर्भात दोन्ही पक्षाच्या कोअर कमिटीत निर्णय होईल, जागावाटपाचा फार्म्युला त्या त्या पक्षाच्या क्षमतेवर ठरेल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Embed widget