Kolhapur News: अरेरे ! वाजत गाजत आणलेली 21 लाखाची दुचाकी पंधरा मिनिटात जळून खाक, लोक म्हणाले...
Kolhapur News : कळंब्यातील तरुणाने दिवाळीत हौसेपोटी चक्क 21 लाखाची दुचाकी खरेदी केली होती. 21 लाखाची दुचाकी खरेदी केल्यानंतर हौसेपोटी वाजत गाजत मिरवणूक देखील काढली होती.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या (Kolhapur Kalamba) कळंब्यातील तरुणाने वाजत गाजत आणलेली 21 लाखाची दुचाकी पंधरा मिनिटात जळून खाक झाली आहे. पेट घेतलेल्या दुचाकीचा व्हिडीओ ( Two Wheeler Burnt) सध्या सोशल मीडियावर (Video Viral On Social Media) व्हायरल होत आहे. कळंबा परिसरात मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन वाहने जळून खाक झाली झाली आहेत. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही.
कळंब्यातील तरुणाने दिवाळीत हौसेपोटी चक्क 21 लाखाची दुचाकी खरेदी केली होती. 21 लाखाची दुचाकी खरेदी केल्यानंतर हौसेपोटी वाजत गाजत मिरवणूक देखील काढली होती. वाजत गाजत आणलेली 21 लाखाची दुचाकी पंधरा मिनिटात जळून खाक झाली आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास लागेलल्या आगीत 21 लाखाची दुचाकी मालकाच्या डोळ्यासमोर जळून खाक झाली. जवळपास 40 लाखांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
दुचाकी गाड्यांची मोठी हौस असल्याने कोल्हापुरातील कळंबा येथे राहणाऱ्या राजेश चौगले या तरुणाने दीपावलीच्या दुचाकी खरेदी केली. एवढ्यावरच न थांबता या तरुणाने त्याच्या नव्याकोऱ्या बाईकची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढली. त्यानंतर युवकाने खरेदी केलेल्या दुचाकीचीचं गावभर चर्चा झाली. वकाने खरेदी केलेली ही आगळीवेगळी दमदार गाडी खरेदी करण्याची हौस त्यांनी नुकतीच पूर्ण केली होती. मध्यरात्री लागलेल्या आगीत दुचाकी जळून खाक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पहिलीच बाईक
कावासाकी निंजा झेडएक्स 10 आर ही पश्चिम महाराष्ट्रात पहिलीच बाईक असल्याने राजेश याने वाजत गाजत गाडीची मिरवणूक काढली होती. याचे व्हिडिओ प्रंचड प्रमाणात सोशल मीडिया मध्ये व्हायरल झाले होते.
पोलिसांमध्ये तक्रार
गाडी जळून खाक झाल्यानंतर राजेशने कोल्हापूरमधील करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी राजेशचा जबाब घेवून तक्रार दाखल करून घतली आहे. परंतु, या प्रकरणी कोणावरही संशय नसल्याचे राजेशने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे जर राजेशचे कोणाबरोबर शत्रुत्व नाही तर मग त्याच्या गाड्या कुणी आणि का जाळल्या याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. तपासानंतरच याबाबत अधिक माहिती मिळेल असे पोलिसांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; सर्वच तालुक्यात रणधुमाळी रंगणार